कोरोना व्हायरसमुळे क्रिकेट स्पर्धा होत नसल्यामुळे टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीसह अनेक खेळाडूंना आपापल्या घरीच रहावे लागत आहे. त्यामुळे प्रत्येकाला आपापल्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवण्यास मिळत आहे. सततच्या दौऱ्यांमुळे त्यांना कुटुंबीयांना वेळ द्यायला मिळत नव्हता. पण, आता कुटुंबीयांना कामात हातभार लावताना खेळाडू दिसत आहेत. महान फलंदाज सचिन तेंडुलकरनं मंगळवारी त्याचा मुलगा अर्जुनचे केस कापत असल्याचा व्हिडीओ पोस्ट केला होता. अनुष्का शर्मानेही बुधवारी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात विराट कोहली काय करतोय, हे पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसेल, परंतु अनुष्का मात्र मजा घेत आहे.
मित्रानं वाचवलं नसतं, तर जीव गेलाच होता; विराट कोहलीनं सांगितला थरारक प्रसंग
विराट-अनुष्का हे कपल नेहमी चर्चेत राहणारे आहे. लॉकडाऊनमुळे या दोघांना लग्नानंतर प्रथमच एवढा वेळ सोबत घालवण्याची संधी मिळाली आहे. काही दिवसांपूर्वी ही दोघं सोबत क्रिकेट खेळताना दिसली होती. त्यानंतर अनुष्कानं आणखी एक व्हिडीओ पोस्ट केला. त्यात विराट डायनॉसरची अॅक्टींग करताना पाहयाला मिळत आहे. अनुष्कानं लिहिलं की,''मला डायनोसोर दिसला..''
पाहा व्हिडीओ...
थ्रोडाऊन स्पेशालिस्ट रघूचे योगदान प्रशंसनीय- विराट कोहली
विराट कोहलीच्या मते थ्रोडाऊन स्पेशालिस्ट डी. राघवेंद्र साईडआर्मने थ्रो करताना १५०-१५५ किमी प्रति तासपेक्षा अधिक वेगाने चेंडू टाकत असल्यामुळे भारतीय फलंदाजांची अलीकडच्या कालावधीत वेगवान गोलंदाजांविरुद्धच्या कामगिरीत सुधारणा करण्यास मदत झाली. बांगलादेशचा स्टार फलंदाज तमीम इक्बालसोबत इन्स्टाग्रामवर लाईव्ह सत्रात बोलताना कोहली म्हणाला, ‘माझ्या मते, या भारतीय संघाने २०१३ पासून वेगवान गोलंदाजीला सामोरे जाताना दाखविलेली सुधारणा केवळ रघूमुळे (राघवेंद्र) आहे. ’
Video : अनुष्कानं टाकला विराटला बाऊंसर; विरुष्काचा क्रिकेट सामना पाहिलात का?
कोहली म्हणाला, ‘मला स्वत:बाबत कधी शंका नसते. दडपण असलेल्या आंतरराष्ट्रीय सामन्यातही मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करतानाही माझी मानसिकता तशीच असते. प्रामाणिकपणे सांगयाचे झाल्यास सामन्यादरम्यान मला कधीच शंका नसते. प्रत्येक व्यक्तीची कमकुवत बाजू असते. त्यामुळे दौऱ्यावर असताना सरावादरम्यान जर तुमचे सत्र चांगले गेले नाही तर तुम्हाला वाटते की फॉर्मात नाही. ’
विराट कोहली स्वतःच्या बायोपिकमध्ये काम करण्यास तयार, पण एका अटीवर
लक्ष्याचा पाठलाग करण्यात माहीर कोहली म्हणाला, बालपणी भारतीय संघाचे सामने बघून मला वाटायचे की मी संघाच्या विजयासाठी उपयुक्त ठरू शकतो. मी लहान असताना भारतीय संघाचे सामने बघत होतो. संघ पराभूत झाल्यानंतर झोपताना विचार करीत होतो की मी सामना जिंकून देऊ शकलो असतो. जर ३८० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मला असे कधीच वाटत नाही की लक्ष्य गाठता येणार नाही.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
भारतापाठोपाठ Sania Mirzaची पाकिस्तानलाही मदत; गरजूंसाठी केलं मोठं दान!
सुपर मॉडलसोबत झालाय इरफान पठाणचा विवाह; Social Mediaवर तिचे फोटो व्हायरल!
भारताचा क्रिकेटपटू उतरला रस्त्यावर; 10000 स्थलांतरितांना करतोय अन्न-पाणी वाटप
Shocking : जगातला खतरनाक योद्धा कोरोना व्हायरससमोर हतबल; कुटुंबातील 20 जणांना लागण!
'फ्लॉप ठरलास, म्हणून संघाबाहेर झालास...' नेटिझन्सच्या ट्विटवर इरफान पठाणचे सडेतोड उत्तर