कोलकाता : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीवर गंभीर आरोप करणारी त्याची पत्नी हसीन जहाँने त्याची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. गेल्या आठवड्याच मोहम्मद शमीच्या कारला अपघात झाला. या अपघात तो किरकोळ जखमी झाला असून त्याच्या डोक्याला दुखापत झाली आहे. दरम्यान, पत्नी हसीन जहाँ हिने सांगितले की, शामी माझ्यासोबत ज्यापद्धतीने वागला, त्याविरोधात माझा लढा सुरु आहे. तो पत्नी म्हणून माझा स्वीकार करत नसला तरी सुद्धा त्याला अशाप्रकारे जमखी झालेलं मी पाहू शकत नाही. मात्र, माझं त्याच्यावर अजूनही प्रेम आहे, कारण तो माझा पती आहे.त्याचबरोबर, मोहम्मद शामी लवकरात लकवर बरा होण्यासाठी हसीन जहॉंने अल्लाहकडे प्रार्थना केली आहे. ती पुढे म्हणाली, शामी बरा व्हावा यासाठी अल्लाहकडे प्रार्थना करते. माझ्या मुलीसह त्याची भेट घेण्याची इच्छा आहे. त्याचाशी संपर्क करण्याच माझा प्रयत्न सुरु आहे. मात्र, तो माझा फोन उचलत नाही. तसेच, कुटुंबीयांशी बोलणे झाले असता ते पण, त्याच्यासंदर्भात काहीच माहिती देत नाहीत.
मोहम्मद शमी कार अपघातात जखमीभारताच्या सध्याच्या आघाडीच्या वेगवान गोलंदाजांपैकी एक असलेला आणि पत्नी हसीन जहाँनने केलेल्या आरोपांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या मोहम्मद शमीच्या कारला रविवारी पहाटे अपघात झाला असून, देहराडूनहून दिल्लीकडे येत असताना ट्रकने धडक दिल्याने झालेल्या या अपघातात तो किरकोळ जखमी झाला आहे. अपघातात शमीच्या डोक्याला दुखापत झाली आहे.
काय आहे प्रकरणहसीन जहाँने आपला पती शामीचे बऱ्याच स्त्रियांशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला होता. त्याचबरोबर पाकिस्तानमध्येही त्याची एक प्रेयसी आहे. तिच्याबरोबर त्याने दुबईमध्ये काही काळ व्यतित केला आहे, असा आरोपही हसीनने केला होता. त्यानंतर हसीनने शामीवर मॅच फिक्सींग आणि देशाची फसवणूक केल्याचा आरोप केला होता. या आरोपांनंतर कोलकाता पोलिसांनी शामीची चौकशी केली होती.