इथपर्यंत कसा पोहोचलो हे माझं मला माहित्येय, ते दिवस कधीच विसणार नाही; सूर्यकुमार यादव झाला इमोशनल

India vs New Zealand, 1st ODI Live : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला वन डे सामना हैदराबाद येथे सुरू आहे आणि भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 03:26 PM2023-01-18T15:26:11+5:302023-01-18T15:27:04+5:30

whatsapp join usJoin us
'I try not to forget how I've reached here': Indian batter Suryakumar Yadav before taking the field against New Zealand | इथपर्यंत कसा पोहोचलो हे माझं मला माहित्येय, ते दिवस कधीच विसणार नाही; सूर्यकुमार यादव झाला इमोशनल

इथपर्यंत कसा पोहोचलो हे माझं मला माहित्येय, ते दिवस कधीच विसणार नाही; सूर्यकुमार यादव झाला इमोशनल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs New Zealand, 1st ODI Live : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला वन डे सामना हैदराबाद येथे सुरू आहे आणि भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. रोहित शर्मा, विराट कोहली व इशान किशन असे तीन फलंदाज माघारी पाठवण्यात किवींना यश आले आहे. शुभमन गिलने सातत्य राखताना अर्धशतक पूर्ण केले आणि सूर्यकुमार यादव त्याला साथ देत आहे.

विराट कोहलीला काही कळण्याआधीच त्रिफळा उडाला; गोलंदाजाने कसला भारी चेंडू टाकला, Video 

सामना सुरू होण्यापूर्वी सूर्यकुमार यादवने ( Suryakumar Yadav) स्टार स्पोर्ट्सशी खास बातचीत केली, ज्यामध्ये त्याने आपल्या भविष्यातील रणनीतीबद्दल चर्चा केली. सूर्याने वन डे क्रिकेटबद्दल सांगितले की, ''मला या फॉरमॅटमध्ये खेळायला नेहमीच आवडते. मला फक्त चांगलं करायचं आहे. या फॉर्मेटमध्ये खेळताना काहीही बदलले नाही. पूर्वी जी उर्जा होती, त्याच उर्जेने मी परत आलो आहे. सामन्याच्या स्थितीनुसार मी खेळेन. लोकांना तुमच्याकडून अपेक्षा असतात आणि तुम्ही त्या पूर्ण करता तेव्हा खूप छान वाटते. मी इथे कसे आलो हे मी कधीही विसरणार नाही.''

इशानची विकेट पडल्यानंतर सूर्यकुमारने मैदानावर पाऊल टाकताच एकच जल्लोष झालेला पाहायला मिळाला. सूर्याने २०२१ साली ट्वेंटी-२० मध्ये पदार्पण केले आणि तेव्हापासून त्याने मागे वळून पाहिले नाही. सूर्या ट्वेंटी-२० क्रमवारीत नंबर १फलंदाज बनला आहे.  त्याने ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३ शतके झळकावली आहेत. त्याने १७ वन डे सामन्यांच्या १६ डावांमध्ये ३८८ धावा केल्या आहेत. लिस्ट-ए क्रिकेटबद्दल त्याने ११९ सामन्यांमध्ये ३२४२ धावा केल्या आहेत. त्यात ३ शतकं आणि १९ अर्धशतकांचा समावेश आहे.  

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

Web Title: 'I try not to forget how I've reached here': Indian batter Suryakumar Yadav before taking the field against New Zealand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.