२०११ मध्ये वन डे विश्वचषक जिंकून भारतीय संघाने तमाम भारतीयांचे स्वप्न साकार केले. श्रीलंकेला अंतिम सामन्यात पराभूत करून टीम इंडियाने तेव्हा विश्वचषक उंचावला होता. विश्वचषकाच्या संघाचा सदस्य राहिलेल्या सुरेश रैनाने विश्वचषक २०११ मधील विजयाबाबत एक खुलासा केला आहे. त्याने सांगितले की, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानविरुद्धचा सामना इतका महत्वाचा होता की तणावाची परिस्थिती खूप होती. हा दबाव हाताळण्यासाठी मी सामन्यापूर्वी बॉर्डर चित्रपटातील गाणी ऐकायचो, असे रैनाने सांगितले.
२०११ च्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा पराभव केला होता. या सामन्यात भारतीय संघाला फार मोठी धावसंख्या करता आली नाही पण उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर संघाने विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली होती.
सुरेश रैनानं सांगितला मंत्रभारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पाहण्यासाठी अवघं क्रिकेट विश्व आतुर असते. सुरेश रैनाच्या मते, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अपेक्षा खूप वाढतात. हिंदी वृत्तवाहिनी 'आजतक'वरील सलाम क्रिकेट शोमध्ये एका प्रश्नाला उत्तर देताना तो म्हणाला, "उपांत्यपूर्व फेरी, उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीच्या सामन्यात तणावाची परिस्थिती असते. आम्ही घरच्या मैदानावर गतविजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळत होतो. त्यानंतर मोहालीत पाकिस्तानविरुद्ध सामना झाला. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून लोकांच्या अपेक्षा खूप वाढतात. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी तणाव कमी करण्यासाठी मी बॉर्डर चित्रपटातील गाणी ऐकायचो." दरम्यान, तब्बल १२ वर्षांनंतर भारतात वन डे विश्वचषकाचा थरार रंगला आहे.
वन डे विश्वचषकातील भारताचे सामने - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया - ८ ऑक्टोबर, चेन्नईभारत विरुद्ध अफगाणिस्तान - ११ ऑक्टोबर, दिल्लीभारत विरुद्ध पाकिस्तान - १४ ऑक्टोबर, अहमदाबादभारत विरुद्ध बांगलादेश - १९ ऑक्टोबर, पुणेभारत विरुद्ध न्यूझीलंड - २२ ऑक्टोबर, धर्मशालाभारत विरुद्ध इंग्लंड - २९ ऑक्टोबर, लखनौभारत विरुद्ध श्रीलंका - २ नोव्हेंबर, मुंबईभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका - ५ नोव्हेंबर, कोलकाताभारत विरुद्ध नेदरलँड्स - १२ नोव्हेंबर, बंगळुरू