सचिनच्या बॅटिंगची कॉपी करायचा प्रयत्न करायचो, सेहवागनं केला खुलासा

भारताचा सर्वात विस्फोटक फलंदाज म्हणून ओळखला गेलेला वीरेंद्र सेहवाग एकेकाळी फलंदाजीत सुधारणा करण्यासाठी सचिन तेंडुलकरच्या फलंदाजी शैलीची कॉपी करण्याचा प्रयत्न करायचा, यावर तुमचा विश्वास बसणार नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 01:22 PM2021-06-10T13:22:03+5:302021-06-10T13:23:21+5:30

whatsapp join usJoin us
I used to try to copy Sachins batting virender sehwag revealed | सचिनच्या बॅटिंगची कॉपी करायचा प्रयत्न करायचो, सेहवागनं केला खुलासा

सचिनच्या बॅटिंगची कॉपी करायचा प्रयत्न करायचो, सेहवागनं केला खुलासा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारताचा सर्वात विस्फोटक फलंदाज म्हणून ओळखला गेलेला वीरेंद्र सेहवाग एकेकाळी फलंदाजीत सुधारणा करण्यासाठी सचिन तेंडुलकरच्या फलंदाजी शैलीची कॉपी करण्याचा प्रयत्न करायचा, यावर तुमचा विश्वास बसणार नाही. पण खुद्द वीरेंद्र सेहवागनं याची कबुली दिली आहे. 
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन-सेहवाग जोडीनं घातलेला धुमाकूळ आणि त्यांच्या पार्टनरशीपची उदाहरणं आजही दिली जातात. सेहवाग धडाकेबाज फलंदाजीसाठी ओळखला जायचा. अनेकदा सचिनपेक्षा सेहवागचा स्ट्राइकरेट अधिक असायचा. पण सचिन आपला नेहमीच आदर्श राहिल्याचं सेहवाग आदरानं सांगतो. सचिनसारखंच तंत्रशुद्ध फलंदाजी करायला मला आवडायचं असं सेहवाग म्हणाला. 

१९९२ सालच्या वर्ल्डकप स्पर्धेपासून सचिनला टेलिव्हिजनवर पाहायचो आणि तेव्हापासूनच सचिनची फलंदाजीची स्टाइल कॉपी करण्याचा प्रयत्न करायचो, असं सेहवाग म्हणाला. "क्रिकेट मैदानात खेळण्याचा खेळ आहे. पण तुम्ही व्हिडिओ पाहूनही बरंच काही शिकू शकता. माझंच उदाहरण द्यायचं झालं तर १९९२ च्या वर्ल्डकप स्पर्धेवेळी मी सचिनची फलंदाजी पाहायला सुरुवात केली होती. त्यांच्या फलंदाजी शैलीची नक्कल करण्याचा मी सराव करायचो. खास करून स्ट्रेट ड्राइव्ह कसा खेळायचा हे मी वारंवार सचिनच्या शैलीतून पाहायचो. १९९२ सालचा वर्ल्डकप मी टेलिव्हिजनवर पाहून सचिनकडून बरंच काही शिकलो", असं सेहवाग सांगतो. 

क्रिकगुरू अॅपचे संस्थापक संजय बांगर यांच्या अॅप लॉन्चच्या कार्यक्रमासाठी सेहवाग उपस्थित होता. त्यावेळी सेहवागनं सध्या मिळत असलेल्या सुविधांवरही भाष्य केलं. "एखाद्याशी ऑनलाइन व्हिडिओ कॉलनं बोलता येईल किंवा व्हिडिओ सबस्क्राइब करुन काही शिकता येईल अशा सुविधा आमच्यावेळी उपलब्ध नव्हत्या. अशा जर सुविधा तेव्हा उपलब्ध असत्या तर मी नक्कीच त्यांच्या उपभोग घेतला असता आणि आणखी चांगलं शिकू शकलो असतो", असं सेहवाग म्हणाला. 
 

 

Web Title: I used to try to copy Sachins batting virender sehwag revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.