Join us  

Asia Cup 2022:"मी सहसा दररोज 100-150 षटकार मारतो", पाकिस्तानी फलंदाजाने भारताला दिला इशारा

आशिया चषक 2022 च्या स्पर्धेस लवकरच सुरूवात होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2022 1:28 PM

Open in App

नवी दिल्ली : लवकरच आशिया चषक 2022 (Asia Cup 2022) च्या स्पर्धेस सुरूवात होणार असून पहिला सामना श्रीलंका आणि अफगाणिस्तान (SL vs AFG) यांच्यामध्ये पार पडणार आहे. तर स्पर्धेचे प्रबळ दावेदार आणि कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) रविवारी 28 ऑगस्ट रोजी आमनेसामने असणार आहेत. या बहुचर्चित स्पर्धेसाठी एकूण 6 संघ रिंगणात असतील, जे सर्व संघ यूएईत दाखल झाले आहेत. खरं तर यंदा आशिया चषकाचा थरार श्रीलंकेत रंगणार होता. मात्र श्रीलंकेत सुरू असलेल्या आर्थिक संकटामुळे ही स्पर्धा यूएईच्या धरतीवर आयोजित करण्यात आली आहे. 

दरम्यान, स्पर्धेपूर्वीच बलाढ्य संघाना मोठे झटके बसले आहेत. भारतीय संघाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह स्पर्धेला मुकणार आहे. तर पाकिस्तानचा शाहिन आफ्रिदी देखील दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर झाला आहे. तसेच बांगलादेशच्या संघातील 2 प्रमुख खेळाडू दुखापतीचे शिकार झाले आहेत. लक्षणीय बाब म्हणजे स्पर्धेचे प्रमुख दावेदार भारत आणि पाकिस्तान असल्याचे बोलले जात आहे. दोन्हीही संघ सध्या शानदार फॉर्ममध्ये असून किताबासाठी मैदानात उतरतील.

पाकिस्तानी फलंदाजाने सांगितली रणनीती

पाकिस्तानच्या संघाची मजबूत बाजू म्हणजे त्यांची सलामी जोडी कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान. तर मधल्या फळीतील फलंदाजीची जबाबदारी असीफ अलीच्या खांद्यावर असणार आहे. 30 वर्षीय असीफ अलीने एक वक्तव्य करून सर्वांचे लक्ष वेधले आहे. "मी दररोज सहसा 100-150 षटकार मारतो", पीसीबीशी बोलताना त्याने केलेल्या या वक्तव्याची क्रिकेट वर्तुळात चर्चा रंगली आहे. तसेच त्याने आपल्या फलंदाजीची रणनीती सांगताना म्हटले, "मी दररोज सराव करताना सहसा 100 ते 150 षटकार मारतो, जेणेकरून सामन्यामध्ये मला 5 ते 6 षटकार मारण्यासाठी मदत होईल." 

आशिया चषक २०२२ चे संपूर्ण वेळापत्रक

पहिला सामना - २७ ऑगस्ट - श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान - दुबईदुसरा सामना - २८ ऑगस्ट - भारत विरुद्ध पाकिस्तान - दुबईतिसरा सामना - ३० ऑगस्ट - बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान - शारजाचौथा सामना - ३१ ऑगस्ट - भारत विरुद्ध हॉंगकॉंग - दुबईपाचवा सामना - १  सप्टेंबर - श्रीलंका विरुद्ध बांगलादेश - दुबईसहावा सामना - २ सप्टेंबर - पाकिस्तान विरुद्ध हॉंगकॉंग - शारजासातवा सामना  - ३ सप्टेंबर - बी१ विरुद्ध बी२ - शारजाहआठवा सामना - ४ सप्टेंबर - ए१ विरूद्ध ए२ - दुबईनववा सामना -   ६ सप्टेंबर - ए१ विरुद्ध बी१ - दुबईदहावा सामना - ७ सप्टेंबर - ए२ विरुद्ध बी२ - दुबईअकरावा सामना - ८ सप्टेंबर - ए१ विरुद्ध बी२ - दुबईबारावा सामना -  ९ सप्टेंबर - बी१ विरूद्ध ए२ - दुबईअंतिम सामना - ११ सप्टेंबर - १ ल्या सुपर ४ मधील पहिला विरूद्ध दुसऱ्या ४ मधील पहिला - दुबई 

आशिया चषकासाठी पाकिस्तानचा संघ -बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम ज्युनिअर, नसीम शाह, शाहनवाज दहानी आणि उस्मान कादिर.   

 

टॅग्स :एशिया कपपाकिस्तानभारतआंतरराष्ट्रीय क्रिकेट
Open in App