कोलकाता : मी भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक बनण्यास खूप उत्सुक होतो, पण अखेर मला प्रशासक म्हणून समाधान मानावे लागले, अशी खंत भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुली याने व्यक्त केली.एका कार्यक्रमामध्ये गांगुलीने आपली निराशा जाहीरपणे व्यक्त करताना भारतीय क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधले. गांगुलीने सांगितले की, ‘तुम्ही तेच काम केले पाहिजे, जे तुम्ही करु शकता आणि त्या कामाच्या परिणामाची चिंता केली नाही पाहिजे. कोणालाच कल्पना नसते की आपले जीवन आपल्याला कुठे घेऊन जाईल. मी १९९९ साली आॅस्टेÑलिया दौºयावर गेलो होतो. त्यावेळी मी उपकर्णधारही नव्हतो. संघाचे नेतृत्त्व सचिन तेंडुलकरकडे होते. परंतु, त्यानंतर तीन महिन्यांमध्येच मी भारतीय संघाचा कर्णधार झालो होतो.’गांगुलीने पुढे म्हटले की, ‘निवृत्तीनंतर जेव्हा मी प्रशासक म्हणून माझ्या नव्या कारकिर्दीची सुरुवात केली, तेव्हा मी भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी खूप उत्सुक होतो. त्यावेळी जगमोहन दालमिया यांनी मला फोन करुन सहा महिन्यांसाठी या पदाकरीता प्रयत्न का नाही करत, असे विचारले होते. मात्र, त्यांचे निधन झाले आणि त्यानंतर कोणीही जवळपास नसल्याने मी बंगाल क्रिकेट संघटनेचा (कॅब) अध्यक्ष बनविण्यात आले. अध्यक्ष बनण्यासाठी साधारणपणे २० वर्षांचा कालावधी लागतो.’यावेळी, गांगुलीने आॅस्टेÑलियन प्रशिक्षक ग्रेग चॅपल यांच्यासोबत झालेल्या विवादाचीही चर्चाकेली. त्याने सांगितले की, ‘ज्यावेळी २००८ साली मी निवृत्तीची घोषणा केली तेव्हा सचिन लंचसाठी आला होता. त्यावेळी सचिनने निवृत्तीचा निर्णय का घेतला अशी विचारणा केली. त्यावेळी मी, आणखी खेळण्याची इच्छा नाही असे सांगितले होते. सचिनने त्यावेळी म्हटले होते की, सध्या मी चांगल्या लयीमध्ये असून मागील तीन वर्ष माझ्यासाठी चांगले ठरले होते.’ (वृत्तसंस्था)
- Cricket Buzz»
- बातम्या»
- मला भारताचा प्रशिक्षक व्हायचे होते, पण..., सौरभ गांगुलीने व्यक्त केली खंत
मला भारताचा प्रशिक्षक व्हायचे होते, पण..., सौरभ गांगुलीने व्यक्त केली खंत
कोलकाता : मी भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक बनण्यास खूप उत्सुक होतो, पण अखेर मला प्रशासक म्हणून समाधान मानावे लागले, अशी खंत भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुली याने व्यक्त केली.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 3:54 AM