Join us  

'या' गोष्टीमुळेच मी मैदान सोडण्याचा निर्णय घेतला होता- गावस्कर

चुकीचे बाद झाल्यावर गावस्कर चिडले, असे सर्वांना वाटत होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2018 3:57 PM

Open in App
ठळक मुद्देभारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर हे क्रिकेटच्या मैदानात शांत असलेले साऱ्यांनीच पाहिले आहे. पण ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात मात्र गावस्कर एकदा चिडलेले पाहायला मिळाले.

पुणे : भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर हे क्रिकेटच्या मैदानात शांत असलेले साऱ्यांनीच पाहिले आहे. पण ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात मात्र गावस्कर एकदा चिडलेले पाहायला मिळाले. चुकीचे बाद झाल्यावर गावस्कर चिडले, असे सर्वांना वाटत होते. पण ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी शिव्या दिल्यामुळेच मी मैदान सोडण्याचा निर्णय घेतला होता, असे गावस्कर यांनी एका खासगी कार्यक्रमात स्पष्ट केले.

'' ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात मेलबर्नच्या कसोटी सामन्यात मी खेळत होतो. माझी चांगली फलंदाजी होत होती. त्यावेळी बॅटची कडा लागलेला एक चेंडू माझ्या पॅडवर आदळला. त्यानंतर पंचांनी मला चुकीच्या पद्धतीने बाद दिले. मी काही पावले चालल्यावर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी मला शिव्या दिल्या. त्यामुळेच मी मैदान सोडण्याचा निर्णय घेतला होता,'' असे गावस्कर यांनी सांगितले.

किरमाणी यांच्या विधानामुळे मैदान बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाया सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅलन बोर्डर हे तीनदा बाद होते. पण पंचांनी त्यांना बाद दिले नाही. पण एकदा बोर्डर हे त्रिफळाचीत झाल्यावरही पंचांना त्याबद्दल संशय होता. त्यावेळी यष्टीरक्षक सय्यद किरमाणी मला म्हणाले, जर पंचांनी आता बाद दिले नाही तर मी मैदान सोडेन. पण पंचांनी त्यावेळी बाद दिले. पण किरमाणींचे शब्द माझ्या डोक्यामध्ये फिट बसले आणि त्यामुळेत मैदानाबाहेर मी पडलो, असे गावस्कर यांनी सांगितले. 

टॅग्स :सुनील गावसकरभारतआॅस्ट्रेलिया