'पिक्चर' बघत बसलेला अय्यर! मध्यरात्री कॅप्टन रोहितचा फोन; मग विराटच्या जागी मारली 'हिरोवाली' एन्ट्री

मॅचनंतर खुद्द श्रेयस अय्यरनं शेअर केली प्लेइंग इलेव्हनमधील एन्ट्रीमागची स्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 14:25 IST2025-02-07T14:17:41+5:302025-02-07T14:25:38+5:30

whatsapp join usJoin us
I was watching a movie Shreyas Iyer reveals Late Night Call From Rohit Sharma on Getting Chance in Playing 11 vs ENG in 1st ODI | 'पिक्चर' बघत बसलेला अय्यर! मध्यरात्री कॅप्टन रोहितचा फोन; मग विराटच्या जागी मारली 'हिरोवाली' एन्ट्री

'पिक्चर' बघत बसलेला अय्यर! मध्यरात्री कॅप्टन रोहितचा फोन; मग विराटच्या जागी मारली 'हिरोवाली' एन्ट्री

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Shreyas Iyer reveals Late Night Call From Rohit Sharma on Getting Chance in Playing 11 : श्रेयस अय्यरनं इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात धमाकेदार खेळी केली. अर्धशतकी खेळीनंतर तो तंबूत परतला. पण त्याने केलेल्या आक्रमक खेळीमुळे इंग्लंडच्या गोलंदाजांचे खांदे पडले. एवढेच नाही तर फिल्डिंगवेळी कमालीची कामगिरी करताना त्याने मोठ्या भागीदारीकडे वाटचाल करणारी इंग्लंडची सलामी जोडीही फोडली होती. या दोन गोष्टींसह अय्यरनं भारतीय संघाच्या पहिल्या विजयात मोलाचा वाटा उचलला. पण मॅच आधी तो प्लेइंग इलेव्हनचा भागच नव्हता. खुद्द श्रेयस अय्यरनं यामागची स्टोरी शेअर केली  आहे.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 
 

विराट खेळला असता तर अय्यर दिसला नसता

इंग्लंड विरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात यशस्वी जैस्वाल याला पदार्पणाची संधी मिळाली. दुसरीकडे विराट कोहलीला दुखापतीमुळे बाकावर बसण्याची वेळ आली. प्लेइंग इलेव्हन पाहिल्यावर विराट कोहली दुखापतग्रस्त असल्यामुळे यशस्वीला संधी मिळालीये, असेच वाटत होते. पण तो  प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार ते आधीच ठरलं होते. जर विराट कोहली पहिल्या सामन्यासाठी फिट असता तर श्रेयस अय्यरच बाकावर बसल्याचे पाहायला मिळाले असते. अय्यरच्या वक्तव्यानंतरच याचा खुलासा झाला आहे.    

प्लेइंग इव्हनमध्ये खेळणार ते श्रेयस अय्यरला मध्यरात्री  कळलं
 
सामन्यानंतर श्रेयस अय्यरनं प्लेइंग इलेव्हनमध्ये कशी संधी मिळाली त्याची स्टोरी सांगितलीये. तो म्हणाला की, "ही एक मजेदार स्टोरी आहे. मी रात्री चित्रपट पाहत बसलो होतो. रात्रभर जागायचं असा विचार माझ्या डोक्यात सुरु होता. तेवढ्यात कॅप्टनचा फोन आला. विराट कोहलीच्या गुडघ्याला सूज आहे. त्यामुळे तुला खेळायचं आहे, असा मेसेज मिळाला. मग मी लगेच झोपेची तयारी केली आणि  रुममध्ये गेलो." 

रोहितससह संघ व्यवस्थापनासमोर चॅलेंज

इंग्लंड विरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात विराटच्या दुखापतीमुळे मिळालेल्या संधीच श्रेयस अय्यरनं सोनं करून दाखवलं. त्याने अवघ्या ३० चेंडूत खणखणीत अर्धशतक पूर्ण केले.  दमदार खेळीसह त्याने मध्यफळीतील सर्वोत्तम पर्याय असल्याचे दाखवून दिले  आहे. आता दुसऱ्या वनडे सामन्यात विराट कोहली फिट झाल्यावर रोहित शर्मा कुणाला बाहेर बसवणार ते पाहण्याजोगे असेल. कदाचित यशस्वी जैस्वालच प्लेइंग इलेव्हनमधून आउट होऊ शकतो.

Web Title: I was watching a movie Shreyas Iyer reveals Late Night Call From Rohit Sharma on Getting Chance in Playing 11 vs ENG in 1st ODI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.