कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलं आहे. आतापर्यंत जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या ही 36 लाख 59,103 वर गेली आहे. त्यापैकी 2 लाख 52, 573 लोकांचा मृत्यू झाला असून 12 लाख 03,404 रुग्ण बरे झाले आहेत. देशातील कोरोना रुग्णांची संख्या ही 46,476 वर पोहोचली असून 1571 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. पण, 12849 लोकं बरी झाली आहेत. हे संकट कधी जाईल, याबाबत कोणीच ठामपणे काहीच सांगू शकत नाही. या व्हायरसमुळे आर्थिक उलाढाल थांबली आहेच, शिवाय क्रीडा स्पर्धांनाही मोठा फटका बसला आहे. त्यामुळेच भारताच्या क्रिकेटपटूं कोरोना व्हायरसच्या संकटानंतर सर्व सोडून शेतकरी बनण्याचा निर्णय घेतला आहे.
Sachin Tendulkar लाही वाटलं होतं सोशल डिस्टन्सिंग वगैरे विसरावं; अंगावर शहारे आणणारा प्रसंग
कोरोना व्हायरसमुळे टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धा एक वर्षासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. इंडियन प्रीमिअर लीगही ( आयपीएल ) दोनवेळा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. सद्यपरिस्थिती पाहता यंदा ती होईल की नाही, यावरही साशंकता आहे. त्यामुळे भारताचा अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंगनं मोठा निर्णय घेतला आहे. कोरोना व्हायरसचे संकट संपल्यानंतर भज्जीनं पंजाबमध्ये जाऊन शेती करण्याचा निर्णय घेतला आहे. आर अश्विनसोबत इंस्टाग्राम लाईव्ह चॅटमध्ये भज्जीनं हा निर्णय सांगितला. 39 वर्षीय भज्जीनं सांगितलं की शेती करणार आणि गरजूंना अन्नधान्य वाटणार आहे.
''या संकटातून आपण काहीतरी शिकावं, यासाठी देव आपली परीक्षा घेत आहे. आपण सातत्यानं दौरे करतो, घरच्यांना वेळ देत नव्हतो. आपण पैशांच्या मागे पळत होतो. आता देवाने आपल्याला स्वतःला वेळ देण्याची संधी दिली आहे. आपण नक्की कुठे आहोत, याची चाचपणी करण्याची संधी देवानं दिली आहे,'' असे भज्जी म्हणाला.
Corona Virusचा खेळाडूंना मोठा झटका; क्रिकेट मंडळानं रद्द केले करार
त्याने पुढे सांगितले की,''मी एवढा पैसा कमावला आहे, की उरलेल्या आयुष्यातही तो खर्च करू शकत नाही. आयुष्य जगायला जास्त पैशांची गरज नाही. कोरोना व्हायरसचे संकट संपल्यानंतर मी पंजाबला जाईन आणि तेथे जमीन विकत घेईन. तेथे भाज्या आणि गव्हाची शेती करीन. त्यानंतर गरजूंना अन्नाच वाटप करीन. इतरांना मदत करणंही तितकंच महत्त्व आहे.''
Handwara Militant Attack: जवाब जरूर मिलेगा; बबिता फोगाटचा दहशतवाद्यांना इशारा
1992 नंतर पाकिस्तान वर्ल्ड कप जिंकू नये, ही तर Wasim Akramची इच्छा; माजी कर्णधाराची टीका
2011चा वर्ल्ड कप 'या' खेळाडूमुळे जिंकलो; Suresh Rainaचा मास्टर स्ट्रोक
Corona Virus : 7 वर्षीय कॅन्सरग्रस्त मुलाला WWE स्टार जॉन सीनानं दिलं सरप्राईज
वर्ल्ड कपनंतर MS Dhoni लाच क्रिकेटपासून दूर रहायचं होतं; माजी निवड समिती प्रमुखाचा दावा