मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकासह अन्य महत्त्वांच्या पदासाठी अर्ज मागवण्याची मुदत संपली आहे. वर्ल्ड कप स्पर्धेतील अपयशानंतर मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. त्यांना आव्हान देण्यासाठी 2000 जणांनी अर्ज केले आहेत, परंतु त्यात टॉम मूडी, रॉबीन सिंग, माईक हेसन आणि लालचंद राजपूत ही नाव अधिक चर्चेची आहेत. नवा प्रशिक्षक मिळेपर्यंत शास्त्रींना 45 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे वेस्ट इंडिज दौऱ्यातून परतल्यानंतरच नव्या प्रशिक्षकाची घोषणा केली जाईल.
भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनेही टीम इंडियाचा प्रशिक्षक होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तो म्हणाला,''टीम इंडियाचा प्रशिक्षक होण्याची माझी इच्छा आहे, परंतु ही योग्य वेळ नाही. अजून काही वेळ जाऊ द्या त्यानंतर मी या पदासाठी अर्ज करेन. सध्या मी इंडियन प्रीमिअर लीग, बंगाल क्रिकेट असोसिएशन, समालोचक अशा विविध पदावर कार्यरत आहे. त्यामुळे या जबाबदारी पार पाडूद्या. त्यानंतर मी प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत उतरीन.''
वर्ल्ड कप स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्यात झालेल्या पराभवानंतर शास्त्रींवर टीका झाली. त्याबाबत गांगुली म्हणाला,''याबाबतचं मत मी राखून ठेवतो. यावर मी मत मांडण्याची ही योग्य वेळ नाही. प्रशिक्षक निवडीच्या प्रक्रियेपासून मी कोसो दूर आहे.''
प्रशिक्षक निवडीतील विराटच्या भूमिकेबाबत गांगुलीने केले मोठे विधान
विराट कोहली हा भारतीय संघाचा कर्णधार आहे. त्यामुळे प्रशिक्षकपदी कोण असावे, याबाबत आपले मत मांडण्याचा त्याला अधिकार आहे, असे गांगुलीने म्हटले आहे. कोलकात्यात एका कार्यक्रमादरम्यान भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक निवडीबाबत भाष्य करताना गांगुली म्हणाला की, विराट कोहली हा संघाचा कर्णधार असल्याने त्याला प्रशिक्षकाबाबत मत मांडण्याचा अधिकार आहे.''
दरम्यान, वेस्ट इंडिज दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना विराट कोहलीने रवी शास्त्री हेच संघाच्या प्रशिक्षकपदी कायम राहिल्यास संघाला आनंद होईल, असे म्हटले होते. सीएसीने याबाबत माझ्याकडे विचारणा केलेली नाही. मात्र तशी विचारणा झाल्यास मी रवी शास्त्री यांचेच नाव घेईन, असे त्यांनी सांगितले.
Web Title: 'I will throw my name into the fray', Sourav Ganguly desires to serve as Team India coach in future
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.