Join us  

IPL 2021, RCB vs DC: रिषभ पंतवर वीरेंद्र सेहवाग संतापला, १० पैकी दिले फक्त ३ गुण!

IPL 202, RCB vs DC: आयपीएलमध्ये मंगळवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (DC) विरुद्धच्या सामन्यात कोहली ब्रिगेडनं दिल्लीचा एका धावेनं पराभव केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 10:09 AM

Open in App

IPL 202, RCB vs DC: आयपीएलमध्ये मंगळवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (DC) विरुद्धच्या सामन्यात कोहली ब्रिगेडनं दिल्लीचा एका धावेनं पराभव केला. सामन्याच्या अखेरच्या चेंडूपर्यंत दिल्लीचा कर्णधार रिषभ पंत भिडला. शेवटच्या चेंडूवर पाच धावांची गरज असताना रिषभनं चौकार लगावला आणि आरसीबीनं एका धावेनं सामना जिंकला. रिषभनं अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले असले तरी भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग रिषभ पंतवर संतापला आहे. रिषभ पंतच्या कर्णधारी भूमिकेवर सेहवागनं नाराजी व्यक्त केली आहे. (I wont give him even 5 out of 10 Virender Sehwag unimpressed with Rishabh Pant captaincy in DC vs RCB game)

IPL 2021चं बायो बबल सर्वात असुरक्षित, परिस्थिती खूपच भयानक; अ‍ॅडम झम्पानं सांगितलं माघार घेण्यामागचं कारण

"कॅप्टन्सीसाठी रिषभला मी १० पैकी ५ गुण देखील देणार नाही. कारण तुम्ही एक कर्णधार म्हणून अशा चुका कधीच करू शकत नाही. जर तुमच्या मुख्य गोलंदाजाला तुम्ही त्याची षटकं पूर्ण करू देत नाही. मग तुमची गणितं कुठंतरी चुकतायत हे लक्षात घ्यायला हवं. एका कर्णधारानं त्याच्या जवळच्या गोलंदाजीचे पर्याय शिताफीनं वापरायला हवेत", असं वीरेंद्र सेहवाग म्हणाला. 

RCBनं एका धावेनं जिंकला सामना अन् विराट कोहलीच्या 'त्या' कृतीनं जिंकली कोट्यवधी मनं!

मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात जबरदस्त कामगिरी करणारा दिल्ली कॅपिटल्सचा फिरकीपटू अमित मिश्रा याला कालच्या सामन्यात त्याची चार षटकं पूर्ण करता आली नाहीत. अमित मिश्रानं आरसीबी विरुद्धच्या सामन्यात तीन षटकं टाकली आणि यात ग्लेन मॅक्सवेल सारख्या महत्वाच्या फलंदाजाला माघारी धाडलं. वीस षटकांच्या अखेरीस अमित मिश्राचं एक षटक शिल्लक राहिलं होतं. याच मुद्द्यावरुन सेहवागनं रिषभ पंतच्या कॅप्टन्सीवर नाराजी व्यक्त केली आहे. 

तुम्हाला सुरक्षित घरी पोहोचविण्याची जबाबदारी आमची; बीसीसीआयचे विदेशी खेळाडूंना आश्वासन

"एक कर्णधार म्हणून संघाच्या आणि खेळाच्या काही रणनिती तुम्हाला शिकाव्याच लागतात. तुमच्या जवळील गोलंदाजीचे पर्याय कसे वापरायचे यातच कर्णधाराचं कसब पणाला लागतं. गोलंदाजीत बदल आणि त्यानुसार क्षेत्ररक्षणाची रणनिती यावर कर्णधारानं लक्ष देणं अतिशय महत्वाचं ठरतं", असंही सेहवाग म्हणाला. 

टॅग्स :आयपीएल २०२१विरेंद्र सेहवागरिषभ पंतदिल्ली कॅपिटल्स