नवी दिल्ली : आशिया चषकासाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे. नवख्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे, तर काही अनुभवी खेळाडूंना आगामी स्पर्धेतून वगळण्यात आलं. यामध्ये रवीचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल आणि शिखर धवन यांसारख्या खेळाडूंचा समावेश आहे. आशिया चषकाच्या संघात आयपीएल फ्रँचायझी मुंबई इंडियन्सचे वर्चस्व दिसते. कारण मुंबईच्या पाच शिलेदारांना भारतीय संघात स्थान मिळालं आहे. कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, तिलक वर्मा आणि इशान किशन हे मुंबई इंडियन्सचे खेळाडू आहेत. पण, युझवेंद्र चहलला संधी न दिल्याने चाहत्यांसह माजी खेळाडूंनी प्रश्न उपस्थित केले.
भारताचा माजी खेळाडू इरफान पठाणने चहलसाठी बॅटिंग केली. मी आशिया चषकाच्या संघात हमखास चहलला घेतलं असतं असं त्यानं म्हटलं. भारतीय संघाची घोषणा झाल्यानंतर इरफानने सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हटले, "बुमराह आणि प्रसिद्ध मोठ्या कालावधीनंतर पुनरागमन करत असल्याने निवडकर्त्यांना काळजी वाटते. त्यामुळेच भारतीय संघ एका अतिरिक्त गोलंदाजासह खेळताना दिसेल, जो फलंदाजी देखील करू शकेल. पण, माझ्या संघात चहल नक्कीच असेल."
दरम्यान, युझवेंद्र चहल, रवीचंद्रन अश्विन आणि शिखर धवन यांना आगामी स्पर्धेत स्थान मिळालं नाही. शिखर धवनला वगळल्यानंतर अजित आगरकर यांनी स्पष्टीकरण देत चर्चांना पूर्णविराम दिला. "शिखर धवन हा भारतासाठी उत्कृष्ट ठरला आहे. पण, आताच्या घडीला रोहित शर्मा, शुबमन गिल आणि इशान किशन हे आमचे तीन पसंतीचे सलामीवीर आहेत", असे आगरकर यांनी स्पष्ट केलं.
आशिया चषकासाठी भारतीय संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन, हार्दिक पांड्या (उप कर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, शार्दूल ठाकूर, प्रसिद्ध कृष्णा,
राखीव खेळाडू - संजू सॅमसन
आशिया चषकाचे वेळापत्रक खालीलप्रमाणे -
३० ऑगस्ट - पाकिस्तान विरूद्ध नेपाळ, मुल्तान
३१ ऑगस्ट - बांगलादेश विरूद्ध श्रीलंका, कँडी
२ सप्टेंबर - पाकिस्तान विरूद्ध भारत, कँडी
३ सप्टेंबर - बांगलादेश विरूद्ध अफगाणिस्तान, लाहोर
४ सप्टेंबर - भारत विरूद्ध नेपाळ, कँडी
५ सप्टेंबर - श्रीलंका विरूद्ध अफगाणिस्तान, लाहोर
६ सप्टेंबर ( सुपर ४) - A1 वि. B2, लाहोर
९ सप्टेबंर ( सुपर ४) - B1 वि. B2, कँडी
१० सप्टेंबर ( सुपर ४) - A1 वि. A2, कँडी
१२ सप्टेंबर ( सुपर ४ ) - A2 वि. B1, दाम्बुला
१४ सप्टेंबर ( सुपर ४ ) - A1 वि. B1, दाम्बुला
१५ सप्टेंबर ( सुपर ४) - A2 वि. B2, दाम्बुला
१७ सप्टेंबर - फायनल
Web Title: I would have included Yuzvendra Chahal in Asia Cup 2023 squad for sure, says former India player Irfan Pathan
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.