T20 World Cup 2022: "मी गिल, मलिक आणि शमीला वर्ल्डकपच्या संघात निवडले असते", दिलीप वेंगसरकरांचं मोठं विधान

ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर पार पडणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2022 12:37 PM2022-09-14T12:37:18+5:302022-09-14T12:38:02+5:30

whatsapp join usJoin us
I would have picked Umran Malik, Shubman Gill and mohammad shami in t20 squad says Dilip Vengsarkar | T20 World Cup 2022: "मी गिल, मलिक आणि शमीला वर्ल्डकपच्या संघात निवडले असते", दिलीप वेंगसरकरांचं मोठं विधान

T20 World Cup 2022: "मी गिल, मलिक आणि शमीला वर्ल्डकपच्या संघात निवडले असते", दिलीप वेंगसरकरांचं मोठं विधान

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर पार पडणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी (T20 World Cup 2022) भारतीय संघाची घोषणा झाली आहे. विश्वचषकाच्या संघात अनेक दिग्गज खेळाडूंना डावलून आशिया चषकात खेळलेल्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. यावरून क्रिकेट वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत. अशातच भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि संघ निवड समितीचे अध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांनी मोठे विधान केले आहे. टी-20 विश्वचषकाच्या संघात शुबमन गिल, उमरान मलिक आणि मोहम्मद शमी यांना मी स्थान दिले असते असे त्यांनी म्हटले. 

ऑस्ट्रेलियातील आयसीसी स्पर्धेसाठी निवड समितीने अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला संधी न दिल्याचे आश्चर्य वाटते असेही त्यांनी म्हटले. "मी टी-20 विश्वचषकासाठी मोहम्मद शमी, उमरान मलिक आणि शुबमन गिल यांची निवड केली असती. त्यांनी आयपीएलमध्ये शानदार कामगिरी केली होती त्यामुळे मोठ्या कालावधीपर्यंत त्यांना टी-20 मध्ये संधी द्यायला हवी होती, असे वेंगसरकर यांनी इंडियन एक्सप्रेसशी संवाद साधताना सांगितले.

भारतीय संघाला वेगवान गोलंदाजीची गरज 
मोहम्मद शमी, उमरान मलिक आणि शुबमन गिल यांसाठी आयपीएलचा मागील हंगाम शानदार राहिला होता. शमी आणि गिल यांनी गुजरातला किताब जिंकून देण्यात मोलाची भूमिका पार पाडली होती. तर मलिकने 150 प्रति ताशी वेगाने गोलंदाजी करून सर्वांनाच आकर्षित केले होते. तसेच मला वाटते की शमीपेक्षा भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल आणि अर्शदीप सिंग यांच्या गोलंदाजीची गती कमी आहे. भारताकडे सध्या वेगाने गोलंदाजी करणारा एकमेव गोलंदाज जसप्रीत बुमराह आहे, असे वेंगसरकरांनी अधिक सांगितले. 

टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघ 
रोहित शर्मा (कर्णधार), के.एल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, हार्दिक पांड्या, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग. 

भारतीय संघाचे वर्ल्ड कप स्पर्धेतील वेळापत्रक
23 ऑक्टोबर - भारत वि. पाकिस्तान, 1.30 वाजल्यापासून, मेलबर्न
27 ऑक्टोबर - भारत वि. A गटातील उपविजेता, 12.30 वाजल्यापासून, सिडनी
30 ऑक्टोबर - भारत वि. दक्षिण आफ्रिका, 4.30 वाजल्यापासून, पर्थ
2 नोव्हेंबर - भारत. वि. बांगलादेश, 1.30 वाजल्यापासून, एडलेड
6 नोव्हेंबर - भारत वि. B गटातील विजेता, 1.30 वाजल्यापासून, मेलबर्न
13 नोव्हेंबरला अंतिम सामना 


 

Web Title: I would have picked Umran Malik, Shubman Gill and mohammad shami in t20 squad says Dilip Vengsarkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.