Join us  

"कर्णधार असताना मला १-२ ICC ट्रॉफी जिंकायच्यात, पण..."; रोहितचं महत्त्वाचं विधान

रोहितने पत्रकार परिषदेत रिकी पॉन्टींगला दिलं सडेतोड उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2023 4:02 PM

Open in App

Captain Rohit Sharma on ICC titles, WTC Final 2023: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम (WTC फायनल) सामना बुधवारपासून ओव्हल मैदानावर खेळवला जाईल. दरम्यान, या ऐतिहासिक अंतिम सामन्यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने पत्रकारांशी संवाद साधताना प्रश्नांना उत्तरे दिली. रोहित शर्माने भारतीय संघाचा आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्याच्या प्रश्नाला उत्तर दिले.

आयसीसी ट्रॉफी न जिंकल्याबद्दल रोहित म्हणाला, "2013 पासून भारतीय संघाने आयसीसी ट्रॉफी जिंकलेली नाही, त्यामुळे प्रत्येक आयसीसी स्पर्धा सुरू होण्यापूर्वी भारतीय संघ हा दुष्काळ कधी संपवणार, असा प्रश्न पडतो. सर्व खेळाडूंना माहित आहे की आम्ही काही वर्षांत काय जिंकले आणि काय जिंकले नाही. सध्या आमचे सर्व लक्ष या सामन्यावर आहे आणि आधी काय झाले आणि काय झाले नाही याचा विचार करणे व्यर्थ आहे. मला काही जेतेपदे जिंकायला आवडतील पण मला माझ्या संघावर जास्त विचार करून दबाव टाकायला आवडणार नाही. कर्णधार म्हणून प्रत्येकाला विजेतेपदे मिळवायची असतात. मला कर्णधार म्हणून एक किंवा दोन ICC ट्रॉफी भारतात आणायला आवडेल. पण मला माहित नाही की भविष्यात काय होईल," असेही रोहितने स्पष्टपणे सांगितले.

रिकी पाँटिंगच्या दाव्याला उत्तर

रिकी पॉन्टिंगने आपल्या एका वक्तव्यात म्हटले की, WTC फायनलमध्ये ऑस्ट्रेलियासाठी परिस्थिती सोपी असेल. पाँटिंगच्या या वक्तव्यावर रोहित शर्मा म्हणाला, “एखादा बाहेरचा माणूस कसा काय सांगू शकतो काय होणार? अशा सामन्यांत पुढे काय होते ते काळच सांगेल. जो संघ पाच दिवस दडपणाची परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळेल तो जिंकेल.”

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियारोहित शर्माआयसीसीआॅस्ट्रेलिया
Open in App