जोहान्सबर्ग : भारताचा आक्रमक कर्णधार विराट कोहली वेस्ट इंडिजचे महान खेळाडू सर व्हिव्हियन रिचर्ड्स यांच्याप्रमाणे संयम बाळगायला शिकेल. त्याच्यामध्ये नेतृत्वक्षमता ठासून भरलेली आहे. रिचर्ड्स आणि विराट कोहली यांच्यात अनेक गोष्टींमध्ये साम्य असल्याचे मत वेस्ट इंडिजचे माजी वेगवान गोलंदाज मायकेल होल्डिंग यांनी व्यक्त केलं आहे. ते पीटीआयशी बोलत होते. विराट कोहलीनं कर्णधारपद साभांळत असताना संयम बाळगावा असा सल्लाही त्यांनी यावेळी त्यांनी दिला आहे.
रिचर्ड्स यांच्याशी कोहलीची तुलना केवळ फलंदाजीमध्ये नाही तर नेतृत्वाबाबतही करतो, असे होल्डिंग यांनी सांगितले. ते म्हणाले, कर्णधारपद सांभाळताना कोहली हा रिचर्ड्स यांच्याप्रमाणे भासतो. रिचर्ड्स यांनी नेतृत्व स्वीकारले त्या वेळी तेही आक्रमक होते. त्यानंतर ते संयमी झाले. कर्णधाराचे अनुकरण अन्य सहकाऱ्यांनी केले. तद्नंतर वेस्ट इंडिजची सांघिक कामगिरी किती उंचावली, हे सर्वाना ठाऊक आहे. विराटबाबतही तसेच घडत आहे. अनुभव गाठीशी येईल, तसा विराट शांत होईल. सध्या तो विराट हा तरुण कर्णधार आहे. नेतृत्वातील बारकावे तो शिकतो आहे. मैदानावर कधी तो अधिक आक्रमक होतो तर कधी अधिकच भावनिक होतो. त्याचे वागणे प्रतिस्पर्धी संघासह त्याच्या सहकाऱ्यांनाही बुचकळय़ात टाकणारे असते. त्याचे आक्रमक वागणेही चक्रावणारे आहे. असे होल्डिंग यांनी म्हटले. विराट कोहलीशिवाय त्यांनी वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराहला इंग्लंडमधील खेळपट्टीवर गोलंदाजी करता येणार नसल्याचे परखड मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
काय म्हणाले बुमराहबद्दल - क्रिकेटचे अनेक दिग्गज क्रिकेटपटू त्याचं कौतूक करत असताना वेस्ट इंडिजचे माजी महान गोलंदाज मायकल होल्डिंग यांनी मात्र त्याच्या टेस्ट करिअरबाबत मोठं विधान केलं आहे. भारतीय संघाच्या इंग्लंड दौ-यासाठी बुमराहचा टीममध्ये समावेश व्हायला नको, तो टीममध्ये खेळण्यास योग्य नाही असं म्हणत त्याच्या गोलंदाजीच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ''जसप्रीत बुमराह इंग्लंडमध्ये चांगली गोलंदाजी करू शकत नाही, नव्या चेंडूने तेथील खेळपट्ट्यांवर गोलंदाजी करण्याची बुमराहची क्षमता नाही. आफ्रिकेच्या खेळपट्ट्यांपेक्षा इंग्लंडच्या खेळप्ट्टाय ब-याच वेगळ्या असतात. मी भारतीय संघाचा कर्णधार असतो तर इंग्लंड दौ-यात बुमराहला टीममध्ये घेतलं नसतं. खेळपट्टीवर चेंडू पुढे टाकण्यास बुमराह सक्षम नाही. आफ्रिकेविरोधातील मालिकेत बुमराहने जास्तीत जास्त चेंडू खाली जोरात आपटण्याचं काम केलं. एखादा जलदगती गोलंदाज कधीच अशी चूक करणार नाही. चेंडू पुढे टाकण्याचा सराव बुमराहला करावा लागेल. मी बुमराहला संधी देणार नाही, तेथील खेळपट्ट्यांवर चेंडू आपटणारा नाही तर खेळपट्टीवरून चेंडूची दिशा बदलवू शकेल अशा गोलंदाजांची गरज आहे. परदेशी खेळपट्ट्यांवर खेळताना कधीही मी भुवनेश्वर कुमारची सर्वात आधी निवड करेल. इंग्लंडच्या खेळपट्ट्यांवर मी भुवनेश्वर नंतर इशांत शर्मा आणि मोहम्मद शमीचा विचार करेल. मी बुमराहला संधी देणार नाही'' असं होल्डिंग म्हणाले.