इयन चॅपल म्हणाले, "अश्विन सर्वोत्कृष्ट गोलंदाजांपैकी एक"; संजय मांजरेकर मात्र असहमत

Sanjay Manjrekar on R. Ashwin : इयन चॅपल यांनी आर. अश्विन याच्या गोलंदाजीचं कौतुक केलं. अश्विन हा सर्वोत्कृष्ट गोलंदाजांपैकी एक, चॅपल यांचं वक्तव्य.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2021 12:22 PM2021-06-06T12:22:56+5:302021-06-06T12:24:52+5:30

whatsapp join usJoin us
ian chappell cited garners example as the best test bowler of the current era sanjay manjrekar disagrees | इयन चॅपल म्हणाले, "अश्विन सर्वोत्कृष्ट गोलंदाजांपैकी एक"; संजय मांजरेकर मात्र असहमत

इयन चॅपल म्हणाले, "अश्विन सर्वोत्कृष्ट गोलंदाजांपैकी एक"; संजय मांजरेकर मात्र असहमत

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देइयन चॅपल यांनी आर. अश्विन याच्या गोलंदाजीचं कौतुक केलं. अश्विन हा सर्वोत्कृष्ट गोलंदाजांपैकी एक, चॅपल यांचं वक्तव्य.

ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटर इयन चॅपल यांनी टीम इंडियाचा स्टार फिरकीपटू आर. अश्विन याचं कौतुक केलं आहे. तसंच त्यांनी अश्विन हा सध्या गोलंदाजांपैकी सर्वोत्कृष्ट गोलंदाज असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. परंतु भारताचे माजी फलंदाज संजय मांजरेकर मात्र इयन चॅपल यांच्या या वक्तव्याशी सहमत नसल्याचं समोर आलं आहे. 

आर. अश्विनच्या परदेशातील कामगिरीबद्दल संजय मांजरेकर यांनी 'ईएसपीएनक्रिकइन्फो'च्या 'रनऑर्डर' या कार्यक्रमादरम्यान संवाद साधताना प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. "भारतातील मैदानांवर रविंद्र जडेजा आणि नुकतंच अक्षर पटेल सारख्या गोलंदाजांनी उत्तम कामगिरी केली आहे." असं ते म्हणाले. यावर चॅपल यांनी वेस्ट इंडिजचे महान जलदगती गोलंदाज जोएल गार्नर यांच्या योगदानाची आठवण करत त्यांच्या विकेट्सची संख्या कमी आहे कारण त्यांच्यासोबत अनेक उत्तम खेळाडू संघात असल्याचं त्यांनी म्हटलं. 

"जेव्हा लोकं त्यांना (अश्विन) सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणतात त्यावर मी सहमत नाही. अश्विननं एसईएनए (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) या देशांमध्ये एकदाही पाचपेक्षा अधिक विकेट घेतल्या नाही. जेव्हा भारतीय मैदांनांवर तुम्ही त्याची उत्तम कामगिरी पाहता तेव्हा गेल्या चार वर्षांमध्ये त्यानं जडेजा इतक्याच विकेट्स घेतल्या आहे. इंग्लंडविरोधात गेल्या सामन्यात पटेलनं त्याच्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्या होत्या," असं संजय मांजरेकर म्हणाले. 

चॅपल यांंनी दिलं मांजरेकरांना गार्नर यांचं उदाहरण

संजय मांजरेकर यांच्या विचारांशी असहमत असलेल्या चॅपल यांनी त्यांना गार्नर यांचं उदाहरण दिलं. "जर तुम्ही गार्नर यांची कामगिरी पाहिली असेल तर त्यांनी अनेकदा पाच विकेट्स घेतल्या नाही. त्यांचे विक्रम पाहाल तर ते इतके प्रभावशाली दिसणार नाहीत. असं यामुळे की त्यांच्याशिवायही टीममध्ये तीन आणखी उत्तम खेळाडू होते. गेल्या काही वर्षांमध्ये भारताची गोलंदाजी उत्तम राहिली असं आहे असं मला वाटतं," असं चॅपल यांनी नमूद केलं. 

चॅपल यांनी सद्य स्थितीतील पाच सर्वोत्कृष्ठ गोलंदाजांमध्ये अश्विनसोबतच इशांत शर्मा, मोहम्मद शमी आणि कॅसिगो रबाडा यांनाही स्थान दिलं आहे. त्यांनी या यादीत पॅट कमिंस याला पहिलं स्थान दिलं आहे. इशांत शर्माची गेल्या तीन वर्षातील कामगिरी उत्तम ठरली आहे. २०१८ मध्ये त्यानं २२ कसोटी सामन्यात ७७ विकेट्स घेतल्या होत्या.

Web Title: ian chappell cited garners example as the best test bowler of the current era sanjay manjrekar disagrees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.