भारतात कोरोना व्हायरसचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. भारतातील कोरोना रुग्णांचा आकडा 7600 झाला असून मृतांची संख्या 249 पर्यंत गेली आहे. आतापर्यंत 774 रुग्ण बरे झाले आहेत. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. या लॉकडाऊनमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ( आयसीसी) आणि भारताचे अम्पायर अनिल चौधरी यांच्यावर झाडावर चढून बसण्याची वेळ आणली.
लॉकडाऊनची घोषणा होण्यापूर्वी अनिल चौधरी उत्तर प्रदेशातील त्यांच्या मुळ गावी गेले. त्यानंतर देशात लॉकडाऊन जाहीर झाला आणि त्यांच्यावर तिथेच अडकण्याची वेळ आली. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या वन डे मालिकेसाठी चौधरी यांची अम्पायर म्हणून नियुक्ती केली होती. पण, ही मालिका रद्द झाली. चौधरी यांनी 20 वन डे आणि 27 ट्वेंटी-20 सामन्यांत अम्पायरींग केली आहे. आपल्या दोन मुलांसह चौधरी उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यातल्या डांग्रोल गावी गेले आहेत. त्यांची पत्नी आणि आई नवी दिल्लीतल्या घरात आहेत.
गावात अडकल्यानं चौधरी यांना आपल्या पत्नी व आईशी संपर्क करताना अडचण जाणवत आहे. त्यामुळे त्यांना मोबाईल नेटवर्कसाठी झाडावर किंवा छतावर चढून बसावे लागत आहे. ''नेटवर्क ही येथील मोठी समस्या आहे. मला कोणाशी बोलताही येत नाही किंवा इंटरनेटचा वापरही करता येत नाही. त्यासाठी मला गावाबाहेर येऊन झाडावर किंवा छतावर चढावे लागते. तरीही प्रत्येकवेळी नेटवर्क सापडेल असे नाहीच,'' असे चौधरींनी सांगितले.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
ग्लेन मॅक्सवेल अन् भारतीय मुलीची Untold Love Story; अशी पडली ऑसी खेळाडूची विकेट!
मोठी बातमी : भारताच्या क्रिकेटपटूनं झोपेतच घेतला अखेरचा श्वास
'दादा'ला कडक सॅल्यूट; कोरोनाच्या संकटात Sourav Gangulyचं लाखमोलाचं समाजकार्य!