Join us  

ICC ने जाहीर केलं टीम इंडियाचं Super 8 चं वेळापत्रक; जाणून घ्या कधी, केव्हा व कोणाला भिडणार

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या Super 8 गटात भारत, ऑस्ट्रेलिया अफगाणिस्तान, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका या पाच संघांनी प्रवेश निश्चित केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2024 7:30 PM

Open in App

T20 World Cup 2024 Super 8: ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या Super 8 गटात भारत, ऑस्ट्रेलिया अफगाणिस्तान, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका या पाच संघांनी प्रवेश निश्चित केला आहे. श्रीलंका, ओमान, नामिबिया, न्यूझीलंड, पापुआ न्यू गिनी, युगांडा, श्रीलंका हे संघ स्पर्धेबाहेर फेकले गेले आहेत. गतविजेता इंग्लंडही त्याच वाटेवर आहे आणि पाकिस्तानची वाटचाल ही अमेरिका व आयर्लंड या लढतीवर अवलंबून आहे. चार गटांतील अव्वल दोन संघ सुपर ८ साठी पात्र ठरणार आहेत आणि उर्वरित ३ जागांसाठी या आठवड्यात जोरदार चुरस पाहायला मिळणार आहे.

स्पर्धेपूर्वी आयसीसीने काही संघांचे सिडींग पक्के केले होते

  • ग्रुप १ - भारत ( A1), ऑस्ट्रेलिया (B2), न्यूझीलंड (C1), श्रीलंका (D2)
  • ग्रुप २ - पाकिस्तान (A2), इंग्लंड (B1), वेस्ट इंडिज (C2), दक्षिण आफ्रिका (D1)

 

सुपर ८ गटासाठी कोणत्या ग्रुपमधून किती जागा शिल्लक

  • ग्रुप अ - एका जागेसाठी अमेरिका सध्या आघाडीवर आहे, परंतु पाकिस्तान व कॅनडा यांनाही संधी आहे
  • ग्रुप ब -  एका जागेसाठी स्कॉटलंड ५ गुणांसह पुढे आहे, परंतु ३ गुण मिळवणारा गतविजेत्या इंग्लंड शर्यतीत आहे
  • गट क - अफगाणिस्तान व वेस्ट इंडिज यांनी पात्रता निश्चित केल्याने युगांडा, पापुआ न्यू गिनी, न्यूझीलंड हे बाद झाले आहेत
  • गट ड - एका जागेसाठी बांगलादेश ( ४ गुण) आघाडीवर असला तरी नेदरलँड्सलाही ( २) संधी आहे.

 सुपर ८च्या लढती १९ ते २४ जून या कालावधीत खेळवल्या जातील. २६ व २७ जूनला उपांत्य फेरीचे सामने अनुक्रमे सॅन फर्नांडो व गयाना येथे होणार आहेत. २९ जूनला बार्बाडोस किंग्स्टन ओव्हल येथे फायनल होईल. सुपर ८ चा ग्रुप १भारत, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, D2 ( अजून ठरलेला नाही) 

T20 World Cup 2024 Super 8 Group 1 schedule

  • २० जून - अफगाणिस्तान वि. भारत, किंग्स्टन ओव्हल - रात्री ८ वाजल्यापासून
  • २० जून - ऑस्ट्रेलिया वि. D2 , सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियम, नॉर्थ स्टँड - पहाटे ६ वाजल्यापासून
  • २२ जून - भारत वि. D2, सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियम, नॉर्थ स्टँड - रात्री ८ वाजल्यापासून
  • २२ जून - अफगाणिस्तान वि. ऑस्ट्रेलिया, अर्नोस व्हॅल ग्राउंड, किंगस्टन - पहाटे ६ वाजल्यापासून 
  • २४ जून - ऑस्ट्रेलिया वि. भारत, डॅरेन सॅमी नॅशनल स्टेडियम, सेंट ल्युसिया - रात्री ८ वाजल्यापासून  
  • २४ जून - अफगाणिस्तान वि. D2, अर्नोस व्हॅल ग्राउंड, किंगस्टन - पहाटे ६ वाजल्यापासून  
टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाभारत-अफगाणिस्तान