Join us  

IND vs AUS: ICCने अचानक बदलला महत्त्वाचा नियम; भारत-ऑस्ट्रेलिया WTC फायनलमध्ये फायदा नक्की कुणाचा?

ICC Rule Change, WTC Final 2023: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने IPL 2023 च्या मध्यातच एक मोठा निर्णय घेतला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2023 4:25 PM

Open in App

IND vs AUS, ICC Rule change: टीम इंडियाला येत्या जून महिन्यात ऑस्ट्रेलिया विरूद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळायची आहे. दोन्ही देशाचे संघही जाहीर करण्यात आले आहेत. या दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) मोठा निर्णय घेतला आहे. क्रिकेटमध्ये लागू असलेला एक नियम काढून टाकण्यात आला आहे. आगामी WTC Final 2023 पासून याची सुरुवात होणार आहे. या निर्णयाचा भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांना फायदा होणार आहे.

ICC ने घेतला मोठा निर्णय

आतापर्यंत सामन्यादरम्यान असे घडत होते की, मैदानावर उपस्थित पंच कोणताही निर्णय घेऊ शकत नसतील, तर हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे पाठवला जायचा, त्यानंतर तिसरा पंच आपला निर्णय देत असे. पण दरम्यान, मैदानावरील पंचांनी त्यांना काय वाटतंय हे 'सॉफ्ट सिग्नल' म्हणून तिसऱ्या पंचांना आपला निर्णय कळवावा लागत होता. त्यामुळे तिसर्‍या पंचांनाही मैदानावरील पंचाच्या निर्णयाभोवतीच आपला निर्णय द्यावा लागत होता, जोपर्यंत निर्णय बदलू शकेल असा कोणताही सबळ पुरावा त्यांच्याकडे नसेल. पण आता आयसीसीने हा नियम हटवला आहे. आता थर्ड अंपायर स्वतःच्या मतानुसार निर्णय देऊ शकणार आहेत. यासाठी मैदानात उपस्थित असलेल्या पंचांना कोणताही 'सॉफ्ट सिग्नल' देण्याची गरज भासणार नाही. हा नियम 1 जून 2023 पासून लागू होणार आहे. क्रिकबझच्या रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आली आहे.

WTC फायनलमध्ये निर्णय लागू होणार!

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ७ जूनपासून खेळल्या जाणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात हा नियम लागू केला जाईल. सौरव गांगुलीच्या अध्यक्षतेखालील आयसीसी क्रिकेट समितीने भारत आणि ऑस्ट्रेलियाला यांना या नियमाबाबत सांगितले आहे, असेही अहवालात म्हटले आहे. लंडनच्या ओव्हल क्रिकेट मैदानावर ७ ते ११ जून दरम्यान WTC Final 2023 हा सामना खेळण्यात येणार आहे.

WTC फायनल 2023 साठी दोन्ही संघ

भारत:रोहित शर्मा (क), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनादकट, इशान किशन (विकेटकीपर).

ऑस्ट्रेलिया: पॅट कमिंस (कप्‍तान), स्‍कॉट बोलँड, एलेक्‍स कॅरी, कॅमरन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेजलवुड, ट्रेविस हेड, जोश इंग्लिस, उस्‍मान ख्‍वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लायन, मिचेल मार्श, टॉड मर्फी, मॅथ्‍यू रेनशॉ, स्‍टीव स्मिथ, मिचेल स्‍टार्क और डेविड वॉर्नर.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियारोहित शर्माविराट कोहलीस्टीव्हन स्मिथआयसीसी
Open in App