Join us  

Women’s T20 World Cup: महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'; ICC नं तब्बल १३४ टक्क्यांनी वाढवली बक्षीस रक्कम

याआधीच्या स्पर्धेच्या तुलनेत यंदाच्या वर्षी बक्षीसांच्या रक्कमेत तब्बल २२५ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2024 3:27 PM

Open in App

ICC Announces Prize Money for Womens T20 World Cup 2024 : यंदाच्या वर्षी महिला टी-२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेत सहभागी होणारे सर्वच्या सर्व १० संघ मालामाल होणार आहेत. आयसीसीने मंगळवारी या स्पर्धेतील बक्षीस रक्कमेची घोषणा केली. ३ ऑक्टोबरला युएईतील शारजाहच्या मैदानात बांगलादेश विरुद्ध स्कॉटलंड यांच्यातील सलामीच्या लढतीनं महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेची उत्सुकता शिगेला पोहचली असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC) स्पर्धेतील विजेत्या संघासह उपविजेता आणि सहभागी संघांना दिल्या जाणाऱ्या बक्षीसांची घोषणा केली. याआधीच्या स्पर्धेच्या तुलनेत यंदाच्या वर्षी बक्षीसाच्या रक्कमेत तब्बल २२५ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. 

विजेत्या संघासह उपविज्यात्या आणि सहभागी संघांना किती मिळणार बक्षीस?

आयसीसीकडून यंदाच्या स्पर्धेतील विजेत्या संघाला २.३४ मिलीयन अमेरिकी डॉलरचे बक्षीस देण्यात येणार आहे. याशिवाय उपविजेत्या संघाला १. ७० मिलियन अमेरिकी डॉलर इतके बक्षीस मिळणार आहे. याशिवाय  उपांत्य फेरीपर्यंत मजल मारणाऱ्या संघाला ६.७५  मिलियन अमेरिकी डॉलर इतकी रक्कम देण्यात येईल. वर्ल्ड कप स्पर्धेत साखळी फेरीत खेळणाऱ्या प्रत्येक संघाला आयसीसीकडून ३१. १५४  मिलियन अमेरिकी डॉलर एवढी रक्कम बक्षीस स्वरुपात देण्यात येईल. 

बक्षीस क्कमेत मोठी वाढ आयसीसीने गत महिला वर्ल्ड कपच्या तुलनेत यावेळी बक्षीसाच्या रक्कमेत २२५ टक्के एवढी घवघवीत वाढ केली आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात वर्ल्ड चॅम्पियन ठरणाऱ्या महिला संघासोबत उपविजेत्या महिला संघाला पूर्वीच्या तुलनेत १३४ टक्के अधिक्क रक्कम बक्षीसाच्या स्वरुपात मिळणार आहे. उपांत्य फेरीत पोहचणाऱ्या संघांना पूर्वीच्या तुलनेत२२१ टक्के अधिक रक्कम दिली जाईल. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघाच्या बक्षीस रक्कमेत ७८ टक्के इतकी वाढ करण्यात आली आहे. 

बांगलादेशमधील संकटामुळं स्पर्धा युएईत स्थलांतरित करण्याची आलीये वेळ

भारतीय महिला संघ ४ ऑक्टोबरला न्यूझीलंड विरुद्धच्या लढतीनं महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या मोहिमेला सुरुवात करेल. भारतीय संघाचा हा सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. आगामी आयसीसी महिला वर्ल्ड कप स्पर्धेचे यजमानपदा हे बांगलादेशकडे होते. पण बांगलादेशमधील राजकीय संकटामुळे स्पर्धा युएईमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना २० ऑक्टोबरला खेळवला जाईल. 

टॅग्स :आयसीसी महिला टी२० विश्वचषकभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघआयसीसी