ऑस्ट्रेलियन खेळाडूंचे वर्चस्व असलेल्या कसोटी संघाचे नेतृत्व विराट कोहलीकडे

आयसीसीनं जाहीर केलेल्या वन डे आणि कसोटी संघाचे नेतृत्व टीम इंडियाच्या विराट कोहलीकडे सोपवण्यात आले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 01:33 PM2020-01-15T13:33:00+5:302020-01-15T13:33:28+5:30

whatsapp join usJoin us
ICC Awards 2019: Virat Kohli named captain in ICC Test team of the year ruled by Australians | ऑस्ट्रेलियन खेळाडूंचे वर्चस्व असलेल्या कसोटी संघाचे नेतृत्व विराट कोहलीकडे

ऑस्ट्रेलियन खेळाडूंचे वर्चस्व असलेल्या कसोटी संघाचे नेतृत्व विराट कोहलीकडे

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( आयसीसी) 2019च्या वर्षाच्या पुरस्कारांची बुधवारी घोषणा करण्यात आली. 2019मधील वन डेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार टीम इंडियाचा हिटमॅन रोहीत शर्मानं पटकावला. आयसीसीनं जाहीर केलेल्या वन डे आणि कसोटी संघाचे नेतृत्व टीम इंडियाच्या विराट कोहलीकडे सोपवण्यात आले आहे. पण, कसोटी संघात ऑस्ट्रेलियाच्याच खेळाडूंचे वर्चस्व जाणवत आहे. कसोटी संघात ऑस्ट्रेलियाच्या पाच, न्यूझीलंडच्या तीन, भारताच्या दोन आणि  इंग्लंडच्या एका खेळाडूचा समावेश आहे. विराटसह भारताचा मयांक अग्रवाल या संघात स्थान पटकावण्यात यशस्वी झाला.


2019मध्ये मयांकने भारताकडून सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्यानं 11 डावांत 68.54 च्या सरासरीनं 754 धावा केल्या आहेत. त्यानं 2018मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी संघात पदार्पण केले. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यानं 243 धावांची खेळी केली. न्यूझीलंडचा यष्टिरक्षक टॉम लॅथमनं 8 सामन्यांत 50च्या सरासरीनं 601 धावा केल्या आहेत. त्यानंही आयसीसीच्या कसोटी संघात स्थान पटकावले. कोहलीनं यंदा 11 डावांत 621 धावा केल्या. 

ICC Awards: विराट कोहलीला आयसीसीकडून मानाचे पान!  हा पुरस्कार देत केला गौरव 

ICC Awards: विराट कोहलीची हॅटट्रिक हुकली, इंग्लंडच्या खेळाडूनं बाजी मारली

ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लाबुशेननं यंदाचं वर्ष गाजवलं. त्यानं 17 डावांत 1104 धावा केल्या. स्टीव्ह स्मिथनेही  कसोटी संघात पुनरागमन करताना 11 डावांत 965 धावा चोपल्या. पॅट कमिन्सनं कसोटीतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावला. त्यानं यंदा 23 डावांत 59 विकेट्स घेतल्या. नॅथन लियॉननं 23 डावांत 45 विकेट्स, तर मिचेल स्टार्कनं 16 डावांत 42 धावा केल्या. या संघात इंग्लंडच्या बेन स्टोक्सनं स्थान पटकावले. त्याला सर्वोत्तम खेळाडूला देण्यात येणाऱ्या गॅरी सोबर्स पुरस्कारानंही आयसीसीनं गौरविले. न्यूझीलंडच्या नील  वॅगनरनं 11 डावांत 43 विकेट्स घेतल्या आहेत.


आयसीसी कसोटी संघ - मयांक अग्रवाल, टॉम लॅथ, मार्नस लाबुशेन, विराट कोहली ( कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, बेन स्टोक्स, बीजे वॉटलींग, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, नील वॅगनर, नॅथन लियॉन.

 

Web Title: ICC Awards 2019: Virat Kohli named captain in ICC Test team of the year ruled by Australians

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.