ICC Awards 2023 Full List (Marathi News) : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) आज तीन आयसीसी पुरस्कार २०२३ साठीची नामांकनं जाहीर केली. आयसीसी पुरुष कसोटी क्रिकेटर ऑफ द इयर, आयसीसी महिला क्रिकेटर ऑफ द इयरसाठी रॅचेल हेहो फ्लिंट ट्रॉफी आणि ICC पुरुष क्रिकेटर ऑफ द इयर सर गार्फिल्ड सोबर्स ट्रॉफी साठी नामांकनं जाहीर केली आहेत. जागतिक क्रिकेट चाहते आता नऊ आयसीसी पुरस्कार श्रेणींमध्ये मतदान करू शकतात. ICC पुरस्कार २०२३ चे विजेते जानेवारी २०२४ च्या शेवटी घोषित केले जातील.
सर गार्फिल्ड सोबर्स ट्रॉफीसाठी नामांकित व्यक्तींमध्ये ऑस्ट्रेलिया आणि भारत प्रत्येकी दोन उमेदवार आहेत. हे दोन्ही संघ वन डे वर्ल्ड कप व जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये एकमेकांसमोर भिडले होते. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने त्या दोन्ही प्रसंगी जेतेपद पटकावले होते. त्यामुळे कमिन्सला वर्षातील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. कमिन्सने २०१९ मध्ये सर्वोत्तम कसोटी खेळाडूचा पुरस्कार पटकावला होता. २०२३ मध्ये त्याने कसोटी आणि वन डे सामन्यांमध्ये ५९ विकेट घेतल्या.
ICC पुरस्कार 2023
- सर गार्फिल्ड सोबर्स ट्रॉफी आयसीसी पुरूष क्रिकेटर ऑफ द इयर; पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया), ट्रॅव्हिस हेड (ऑस्ट्रेलिया), रवींद्र जडेजा (भारत), विराट कोहली (भारत)
- ICC महिला क्रिकेटर ऑफ द इयर साठी रॅचेल हेहो फ्लिंट ट्रॉफी; चमारी अटापटू (श्रीलंका), अॅशले गार्डनर (ऑस्ट्रेलिया), बेथ मूनी (ऑस्ट्रेलिया), नॅट सायव्हर-ब्रंट (इंग्लंड)
- ICC पुरुष कसोटी क्रिकेटर ऑफ द इयर; आर अश्विन (भारत), ट्रॅव्हिस हेड (ऑस्ट्रेलिया), उस्मान ख्वाजा (ऑस्ट्रेलिया), जो रूट (इंग्लंड)
- ICC पुरुष वन डे क्रिकेटपटू ऑफ द इयर; शुबमन गिल (भारत), विराट कोहली (भारत), डॅरिल मिचेल (न्यूझीलंड), मोहम्मद शमी (भारत)
- ICC महिला वन डे क्रिकेटर ऑफ द इयर; चमारी अटापटू (श्रीलंका), अॅशले गार्डनर (ऑस्ट्रेलिया), अमेलिया केर (न्यूझीलंड), नॅट सायव्हर-ब्रंट (इंग्लंड)
- ICC पुरुष T20I क्रिकेटर ऑफ द इयर; मार्क चॅम्पमन (न्यूझीलंड), अल्पेश रामजानी (युगांडा), सिकंदर रझा (झिम्बाब्वे), सूर्यकुमार यादव (भारत)
- ICC महिला T20I क्रिकेटर ऑफ द इयर; चमारी अटापटू (श्रीलंका), सोफी एक्लेस्टोन (इंग्लंड), हेली मॅथ्यूज (वेस्ट इंडीज), एलिस पेरी (ऑस्ट्रेलिया)
- ICC इमर्जिंग मेन्स क्रिकेटर ऑफ द इयर; गेराल्ड कोएत्झी (दक्षिण आफ्रिका), यशस्वी जैस्वाल (भारत), दिलशान मदुशंका (श्रीलंका), रचिन रवींद्र (न्यूझीलंड)
- ICC उदयोन्मुख महिला क्रिकेटर ऑफ द इयर; मारुफा अक्टर (बांगलादेश), लॉरेन बेल (इंग्लंड), डार्से कार्टर (स्कॉटलंड), फोबी लिचफिल्ड (ऑस्ट्रेलिया)