Join us  

पुराव्याविना माझ्यावर आयसीसीने दोन वर्षांची बंदी लादली - जयसूर्या

जयसूर्याने आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाला सहकार्य केले नाही आणि आपल्यावरील आरोप खोडून काढण्यात अपयशी ठरल्याने जयसूर्यावर आयसीसीने कारवाई केली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2019 4:37 PM

Open in App

नवी दिल्ली : मॅच व पिच फिक्सिंगप्रकरणी श्रीलंकेचा माजी सलामीवीर सनथ जयसूर्यावर दोन वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. पण जयसूर्याने, पुराव्याविना माझ्यावर आयसीसीने बंदी घातल्याचे म्हटले आहे.

जयसूर्याने आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाला सहकार्य केले नाही आणि आपल्यावरील आरोप खोडून काढण्यात अपयशी ठरल्याने जयसूर्यावर आयसीसीने कारवाई केली होती. आयसीसीने जयसूर्यावर 2.4.6 आणि 2.4.7 या कलमांद्वारे कारवाई केली आहे.

याबाबत जयसूर्या म्हणाला की, " मला झालेली शिक्षा दुर्दैवी आहे. आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाला मी संपूर्ण माहिती दिली होती. त्यामुळे माझ्यावर ज्या कलमांद्वारे आरोप लावले आहेत ते चुकीचे आहेत. मी नेहमीच देशाला प्रथम प्रधान्य देत आलो आहे आणि क्रिकेटच्या चाहत्यांनाही हे माहिती आहे. या कठिणप्रसंगी माझ्या मागे उभ्या असलेल्या चाहत्यांचे मी आभार मानू इच्छितो."

नेमके काय आहे प्रकरणश्रीलंका क्रिकेट संघावर सातत्याने मॅच फिक्सिंग व पिच फिक्सिंग ( सामना निश्चिती व खेळपट्टी निश्चिती ) केल्याचे आरोप होत होते. त्याचा तपास करण्यासाठी आयसीसीचे लाचलुचपत विभाग कामाला लागले होते. त्यांनी या तपासाचा अहवाल नुकताच श्रीलंकेचे पंतप्रधान आणि आयसीसी अध्यक्षांकडे सुपूर्द केला. या गुपित अहवात अल जझीरा चॅनेलचा हाती लागला असून त्यांनी श्रीलंकेच्या दोषी खेळाडूंची नावे जाहीर केली.

या अहवालात दोषी खेळाडूंनी मॅच फिक्सिंग केल्याची कबुली दिल्याची टेप आहे. त्यानुसार या खेळाडूंमध्ये माजी कर्णधार अँजेलो मॅथ्यूज, सचिक्षा सेनानायके, वनिंधू हसरंगा, चतुरंगा डी सिल्वा, दानुष्का गुनतिलके आणि निरोशन डिकवेला यांचा समावेश आहे. जेफ्री डेबारेरा हे पिच फिक्सिंगमध्ये दोषी आढळले आहेत.

या खेळाडूंमध्ये सर्वात धक्कादायक नाव समोर आले आहे आणि ते म्हणजे महान फलंदाज सनथ जयसूर्या याचे. तो मॅच फिक्सिंग आणि पिच फिक्सिंग या दोन्ही प्रकरणात दोषी आढळला आहे. संघातील खाजगी गोष्टींसह खेळपट्टीबाबत फिक्सर्सना माहिती पुरवण्याचे काम तो करत असल्याचा दावा करण्यात येत आहे.  

टॅग्स :आयसीसी