ICC bans transgender players : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या वतीने मोठा निर्णय घेतला गेला आहे. आता ट्रान्सजेंडर क्रिकेटर्स आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये खेळू शकणार नाहीत, अशी घोषणा करण्यात आली आहे. खेळाची अखंडता व निकोप स्पर्धा कायम राखण्यासाठी आयसीसीने हा निर्णय घेतला आहे. आता ट्रान्सजेंडर खेळाडू महिला क्रिकेटमध्ये कोणत्याही प्रकारे खेळू शकणार नाहीत असे स्पष्ट करण्यात आले आहे. अहमदाबादमध्ये मंगळवारी झालेल्या ICC च्या बैठकीत याला दुजोरा देण्यात आला.
आयसीसीच्या निवेदनात म्हटले आहे की, “नवीन धोरण काही तत्त्वांवर आधारित आहे, ज्यात प्राधान्यक्रम, महिलांच्या खेळाची अखंडता, सुरक्षितता, निष्पक्षता आणि सर्वसमावेशकता यांचा समावेश आहे आणि याचा अर्थ असा आहे की कोणताही ट्रान्सजेंडर व्यक्ती आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेट खेळात भाग घेऊ शकणार नाही, जरी त्याच्यावर लिंग बदल शस्त्रक्रिया झाली असेल.
महिला क्रिकेटला चालना
महिला क्रिकेटमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आंतरराष्ट्रीय व्यतिरिक्त, फ्रँचायझी महिला क्रिकेटलाही भरपूर चालना मिळत आहे. २०२३ मध्ये भारतात प्रथमच महिला आयपीएलचे आयोजन करण्यात आले होते, जे महिला प्रीमियर लीग म्हणून ओळखले जात होते. स्पर्धेच्या पहिल्या सत्रात एकूण पाच संघ सहभागी झाले होते. मागच्या वेळेप्रमाणे २०२४ मध्ये महिला प्रीमियर लीग खेळवली जाईल. याचा अर्थ आंतरराष्ट्रीय क्रिकेट व्यतिरिक्त महिला क्रिकेटलाही फ्रँचायझी क्रिकेटमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळत आहे. त्यावरही यात चर्चा झाली.
Web Title: ICC bans transgender players from women international cricket
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.