कोलकाता : पुढील वर्षी यूनायटेड किंग्डममध्ये रंगणाऱ्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे पडघम आत्ताच वाजू लागले असून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) कोलकाता येथे घेतलेल्या एका विशेष बैठकीमध्ये वेळापत्रकात माफक बदल करत स्पर्धेच्या स्वरुपाविषयी चर्चा केली. बैठकीत झालेल्या चर्चांनुसार आयसीसीने लोढा समितीच्या शिफारशींचा गांभिर्याने विचार करत भारताच्या वेळापत्रकात बदल केला आहे. यानुसार भारतीय संघ २०१९ सालच्या विश्वचषकाच्या मोहिमेची सुरुवात २ जून ऐवजी चार जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध करेल. आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय सामन्यांच्यामध्ये किमान १५ दिवसांचे अंतर असावे या लोढा समितीच्या शिफारसीची दखल घेत आयसीसीने हा बदल केला आहे.पुढील वर्षी ३० मे ते १४ जुलै दरम्यान यूनायटेड किंग्डम येथे विश्वचषक क्रिकेटच थरार रंगेल. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती दिली की, ‘पुढील वर्षी २९ मार्च ते १९ मे दरम्यान आयपीएल रंगेल, परंतु आम्हाला आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी किमान १५ दिवसांचे अंतर ठेवावे लागेल आणि विश्वचषक स्पर्धा ३० मेपासून सुरु होईल. त्यामुळे १५ दिवसांचे अंतर ठेवण्यासाठी आम्ही ४ जूनपासून सामने खेळू शकतो.’दखल घेण्याची बाब म्हणजे याआधी स्टेडियम खचाखच भरावे यासाठी आयासीसीच्या मुख्य स्पर्धांची सुरुवात भारत वि. पाकिस्तान या हायव्होल्टेज सामन्याने केली जायची. २०१५ साली झालेला विश्वचषक (अॅडलेड) आणि २०१७ सालची चॅम्पियन्स ट्रॉफी (बर्मिंघहॅम) या स्पर्धेतही याच सामन्याने सुरुवात झाली होती. ‘राऊंड रॉबिन पद्धतीने होणाºया या स्पर्धेत पहिल्यांदाच भारत - पाकिस्तान सामन्याने सुरुवात होणार नाही,’ असेही बीसीसीआय अधिकाºयाने म्हटले. (वृत्तसंस्था)भविष्यातील ५ वर्षांच्या दौºयांवर झाली चर्चा...यावेळी बैठकीमध्ये २०१९ - २३ अशा पाच वर्षांच्या भविष्यातील दौºयांवरही (एफटीपी) चर्चा झाली. याविषयी बीसीसीआयच्य अधिकाºयाने माहिती दिली की, ‘याआधी आम्ही ठरविलेल्या नुसार, भारत या कालावधीमध्ये सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये मिळून जास्तीत जास्त ३०९ दिवस आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळेल.गेल्या पाच वर्षाच्या कालावधीच्या तुलनेत हे ९२ दिवसांनी कमी आहे. त्याचवेळी घरच्या मैदानांवरील कसोटी सामन्यांची संख्या वाढवून १५ ते १९ इतकी होईल. हे सर्व कसोटी सामने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग असतील.’सध्या भारताच्या दिवस - रात्र कसोटी सामन्याविषयी उत्सुकता वाढली असून येणाºया काळात तरी भारतीय संघ दिवस - रात्र सामना खेळणार नाही हे स्पष्ट झाले आहे. हे सामने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे भाग नसल्याने सध्या तरी भारतीय संघ दिवस - रात्र सामने खेळणार नसल्याचे बीसीसीआयने अधिकाºयाने स्पष्ट केले आहे.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- बीसीसीआयपुढे आयसीसी नमली; भारताच्या वेळापत्रकात केला बदल
बीसीसीआयपुढे आयसीसी नमली; भारताच्या वेळापत्रकात केला बदल
विश्वचषक क्रिकेट स्पर्धा : लोढा शिफारशीची दखल; भारताच्या वेळापत्रकात केला बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 12:10 AM