राष्ट्रकुल स्पर्धेतही टी-२० क्रिकेट?; टीम इंडियासाठी 'सुवर्ण'संधी

बर्मिंगहॅक येथे 2022 मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचा समावेश होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2018 12:01 PM2018-11-26T12:01:05+5:302018-11-26T12:23:14+5:30

whatsapp join usJoin us
ICC bids for Women's Cricket in Commonwealth Games | राष्ट्रकुल स्पर्धेतही टी-२० क्रिकेट?; टीम इंडियासाठी 'सुवर्ण'संधी

राष्ट्रकुल स्पर्धेतही टी-२० क्रिकेट?; टीम इंडियासाठी 'सुवर्ण'संधी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्दे1998 नंतर राष्ट्रकुल स्पर्धेत प्रथमच होणार क्रिकेट स्पर्धाआंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची जोरदार मोर्चेबांधणीआयसीसीचे सीईओ यांची माहिती

मुंबई : बर्मिंगहॅक येथे 2022 मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचा समावेश होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( ICC ) 2022च्या राष्ट्रकुल स्पर्धेत महिला क्रिकेटचा समावेश व्हावा यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. आयसीसीचे मुख्या कार्यकारी अधिकारी डेव्हिड रिचर्डसन यांनी त्यासंबंधीची माहिती दिली आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत महिलांच्या ट्वेंटी-20 क्रिकेटचा समावेश होण्यासाठी आयसीसीने रितसर अर्ज पाठवला आहे.

आयसीसीने हा अर्ज इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाच्या यजमानपदाखाली केला आहे. याआधी 1998च्या राष्ट्रकुल स्पर्धेत क्रिकेट खेळवण्यात आले होते. त्यात दक्षिण आफ्रिकेने बाजी मारली होती. आयसीसीचा अर्ज मान्य केल्यास 24 वर्षानंतर पुन्हा क्रिकेट राष्ट्रकुल स्पर्धेत दिसेल. महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी आयसीसीने हे पाऊल उचलले आहे.  ''क्रिकेटला जगभरात मोठा प्रेक्षकवर्ग आहे. त्यामुळे राष्ट्रकुल स्पर्धेत त्याचा समावेश झाल्याने दोन्ही घटकांना समान फायदा होईल. या पुढाकाराने महिला क्रिकेटलाही प्रोत्साहन मिळेल,'' अशी आशा रिचर्डसन यांनी व्यक्त केली आहे. 



ते पुढे म्हणाले,''महिला क्रिकेटला चालना देण्यासाठी बर्मिंगहॅम हे योग्य ठिकाण आहे. या शहरातील 23 टक्के लोकं क्रिकेटशी निगडीत आहेत. पण, राष्ट्रकुल स्पर्धेत क्रिकेटचा समावेश झाल्यास, येथे क्रिकेट संस्कृती वाढेल.'' राष्ट्रकुल स्पर्धेत महिला क्रिकेटचा समावेश झाल्यास भारतीय संघाला ऐतिसाहासिक पदक जिंकण्याची संधी मिळू शकते. 

Web Title: ICC bids for Women's Cricket in Commonwealth Games

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.