Big News : २०२८च्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश होणार, १२८ वर्षांनंतर क्रीडा महोत्सवात चौकार-षटकार लागणार?; आयसीसीनं दिले मोठे अपडेट्स

१९००च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता आणि त्यात ग्रेट ब्रिटन व फ्रान्स अशा दोनच संघांनी सहभाग घेतला होता. त्यामुळे १२८ वर्षांनंतर पुन्हा ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट स्पर्धा होताना दिसतील.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 12:36 PM2021-08-10T12:36:14+5:302021-08-10T12:36:14+5:30

whatsapp join usJoin us
ICC can confirm its intention to push for cricket's inclusion in the Olympics, with the 2028 Games in Los Angeles being the primary target | Big News : २०२८च्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश होणार, १२८ वर्षांनंतर क्रीडा महोत्सवात चौकार-षटकार लागणार?; आयसीसीनं दिले मोठे अपडेट्स

Big News : २०२८च्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश होणार, १२८ वर्षांनंतर क्रीडा महोत्सवात चौकार-षटकार लागणार?; आयसीसीनं दिले मोठे अपडेट्स

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( ICC) ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांनी २०२८मध्ये लॉस अँजिलिस येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी ते बोली लावणार आहेत. ( The ICC has confirmed its intention to push for cricket’s inclusion in the Olympic Games going forward). आयसीसीनं त्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. अमेरिकेत क्रिकेटचे ३० मिलियन फॅन्स आहेत आणि ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटच्या पुनरागमनासाठी २०२८ लॉस अँजिलिस याशिवाय दुसरी स्पर्धा योग्य ठरूच शकत नाही. १९००च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता आणि त्यात ग्रेट ब्रिटन व फ्रान्स अशा दोनच संघांनी सहभाग घेतला होता. त्यामुळे १२८ वर्षांनंतर पुन्हा ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट स्पर्धा होताना दिसतील.

Neeraj Chopra : तुम्हाला माहित्येय का? गोल्डन बॉय नीरज चोप्रासाठी भारत सरकारनं खर्च केले किती कोटी?

२०२२च्या राष्ट्रकुल स्पर्धेत क्रिकेटचे पुनरागमन होत आहे आणि आता ऑलिम्पिक स्पर्धेतही क्रिकेट पुन्हा एन्ट्री घेण्यासाठी सज्ज आहे. आयसीसीचे प्रमुख ग्रेग बार्क्ले यांनी सांगितले की,''सर्वप्रथम आयसीसीच्या सर्व सदस्यांच्या वतीनं मी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे आणि जपानच्या प्रत्येक व्यक्तिचे अभिनंदन करतो, की त्यांनी टोकियोत ऑलिम्पिकचे यशस्वी आयोजन करून दाखवले. ऑलिम्पिक स्पर्धा पाहताना अत्यानंद झाला आणि भविष्यात ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश होताना पाहणे आम्हाला आवडेल. जगभरात क्रिकेटचे कोट्यवधी चाहते आहेत आणि त्यापैकी ९० टक्के चाहत्यांनाही ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश हवा आहे.''

"UPA सरकारकडून हवा तसा पाठिंबा नव्हता; ऑलिम्पिकमधील भारताच्या यशाचं श्रेय पंतप्रधान मोदींना!"

ते पुढे म्हणाले,''क्रिकेटचा खूप मोठा चाहता वर्ष आहे आणि दक्षिण आशियातून ९३ टक्के चाहते आहेत, शिवाय अमेरिकेतही ३० मिलियन फॅन्स आहेत. या सर्व चाहत्यांसाठी ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट होणे, यापेक्षा सुखावणारा दुसरा क्षण नसेल. पण, आमच्याच प्रकारे अनेक खेळांनाही ऑलिम्पिकमध्ये सहभाग घ्यायचा आहे आणि त्यामुळे आम्हाला आमच्याकडून सर्वतोपरी प्रयत्न करावे लागतील. हीच ती वेळ आहे.''

आयसीसीनं तयार केलेल्या ऑलिम्पिक समितीचे प्रमुख इंग्लंड व वेल्स क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष इयान वॅटमोर आहेत. त्यांच्यासोबत आयसीसीचे डायरेक्टर इंद्रा नूयी, झिम्बाब्वे क्रिकेटचे तावेंग्वा मुकुहलानी, अशियन क्रिकेट काऊन्सिलचे महिंदा वल्लीपूरम आणि अमेरिकन क्रिकेटचे प्रमुख पराग मराठे आहेत.   

Read in English

Web Title: ICC can confirm its intention to push for cricket's inclusion in the Olympics, with the 2028 Games in Los Angeles being the primary target

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.