Join us

AUS vs SA : सेमीत धडक मारण्यासाठीची लढाई; अन् रावळपिंडीत वाजलं 'आज मौसम बेईमान है..' गाणं

जर पावसामुळे सामना रद्द झाला तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 14:39 IST

Open in App

Champions Trophy 2025,  AUS vs SA 7th Match Group B Toss delayed due to rain : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील सातव्या सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील लढत रावळपिंडीच्या मैदानात नियोजित आहे. हा सामना जिंकून दोन्ही संघ सेमीचा मार्ग सुकर करण्याच्या इराद्याने मैदानात उतरण्यास सज्ज आहेत. पण या सामन्यातील टॉस निर्धारित वेळेत होऊ शकलेला नाही.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

सेमीत धकड मारण्याची तयारी, पण दोन्ही संघ मैदानात उतरण्याआधी पावसानं सुरु केलीये बॅटिंग 

मॅच आधी पावसाची बॅटिंग सुरु असल्यामुळे टॉसला उशीर होत आहे. जर पावसामुळे हा सामना प्रभावित झाला तर 'ब' गटातील सेमीच्या शर्यतीत नव ट्विस्ट पाहायला मिळू शकते. या गटात जे दोन संघ आघाडीवर आहेत त्या दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाला याचा मोठा फटका बसू शकतो. जाणून घेऊयात ते कसं यासंदर्भातील स्टोरी 

कुणाला बसेल सर्वात मोठा फटका?

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील आपल्या सलामीच्या लढतीत दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघांनी विजय मिळवला आहे. जर हा सामना पावसामुळे अनिर्णित राहिला तर दोन्ही संघांना फक्त एक-एक गुणावर समाधान मानावे लागेल.  या परिस्थितीत मागे राहिलेल्या इंग्लंड आणि अफगाणिस्तानच्या संघाला फायदा मिळू शकतो.

जर मॅच झाली नाही तर काय?

रावळपिंडीच्या मैदानात पावसाने आपली बॅटिंग थांबवली असली तरी खेळपट्टीवरील कव्हर क्रिकेट लव्हरला निराश करणारा सीन दाखवते. या सामन्यात जो संघ जिंकेल, तो समीच्या दिशेनं एक पाऊल पुढे टाकेल. ४ गुण सेमीत पोहचण्याची  गॅरेंटी नसली तरी हे मापदंड संघाचे स्पर्धेतील आव्हान सेफ करणारे आहे. पण जर मॅचच झाली नाही तर दोन्ही संघाला प्रत्येकी  एक गुणावर समाधान मानावे लागले.  उर्वरित एक सामना जिंकून दोन्ही संघ ५ गुणांपर्यंत पोहचू शकतात. पण याउलट सामना गमावला तर यातील संघाला ३ गुणावरच राहण्याची वेळ येईल. या परिस्थितीत सध्याच्या घडीला मागे असणारा संघ उर्वरित २ सामने जिंकून ४ गुणांपर्यंत पोहचत  सेमीच्या शर्यतीत पुढे निघून जाऊ शकतो. 

टॅग्स :चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५आॅस्ट्रेलियाद. आफ्रिकाइंग्लंडअफगाणिस्तान