कांगारुंचा हिशोब चुकता! भारताची फायनलमध्ये दणक्यात एन्ट्री, पाकला बसला '४४० व्होल्टचा झटका'

भारतीय संघानं ४ विकेट्स राखून मैदान दुबईच मैदान मारत घेतला २०२३ च्या घरच्या मैदानातील पराभवाचा बदला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 21:43 IST2025-03-04T21:40:08+5:302025-03-04T21:43:25+5:30

whatsapp join usJoin us
ICC Champions Trophy 2025 IND vs AUS 1st Semi Final Virat Kohli Master Class Show KL Rahul Hardik Pandya Finishing Touch India Defeats Australia Enters Final In Dubai | कांगारुंचा हिशोब चुकता! भारताची फायनलमध्ये दणक्यात एन्ट्री, पाकला बसला '४४० व्होल्टचा झटका'

कांगारुंचा हिशोब चुकता! भारताची फायनलमध्ये दणक्यात एन्ट्री, पाकला बसला '४४० व्होल्टचा झटका'

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

सातत्याने आयसीसीस स्पर्धेत ट्रॉफी आड येणाऱ्या कांगारुंचा बुक्का पाडत भारतीय संघानं आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेची फायनल गाठली आहे. दुबईच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियान सेट केलेल्या धावांचा पाठलाग करताना विराट कोहलीच्या भात्यातून दमदार खेळी आली. कोहली आपलं काम करून गेल्यावर आलेल्या पांड्यानं "मेरे जैसा कोई हार्डच नहीं है" शो दाखवत भारतीय संघाच्या आयसीसी ट्रॉफी आड येणाऱ्या कांगारूंचा चांगलाच समाचार घेतला. केएल राहुल शेवटपर्यंत मैदानात थांबला आणि जड्डूच्या साथीनं त्याने सिक्सर मारत भारतीय संघाला ४ विकेट्स राखून दाबात विजय मिळवून दिला.  

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

फायनल दुबईतच!

दुबईच्या मैदानात भारतीय संघानं वनडे वर्ल्ड कप २०२३ स्पर्धेच्या फायनलमधीलच नव्हे तर सातत्याने आयसीसीच्या स्पर्धेत भारताचा हिरमोड करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला स्पर्धेबाहेर केले. त्यामुळेच हा विजय खूप मोठा आहे. याशिवाय भारतीय संघानं  चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेची  फायनल गाठल्यामुळे यजमान पाकिस्तानलाही  '४४० व्होल्टचा झटका' बसला आहे.  कारण आता यजमान पाकिस्तान असले तरी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेची फायनलही दुबईच्या मैदानातच खेळवली जाईल. 

विराट कोहलीशिवाय केएल राहुलचीही दमदार खेळी

दुबईच्या मैदानात रंगलेल्या पहिल्या सेमी फायनलमध्ये पहिल्यांदा बॅटिंग करताना स्मिथ ७३ (९६) आणि कॅरीच्या ६१ (५७) अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियन संघानं २६४ धावा करत भारतीय संघासमोर २६५ धावांचे आव्हान सेट केले होते. दुबईच्या मैदानातील हे टार्गेट पार करणे मोठे आव्हानच होते. याशिवाय ऑस्ट्रेलियाविरुद्ध नॉकआउट मॅचमध्ये भारताने कधीच एवढ्या धावांचा यशश्वी पाठलाग केला नव्हता. पण विराटनं ८४ (९८) क्लास खेळी केली. त्याला श्रेयस अय्यर ४५ (६२), लोकेश राहुल ४२(३४)* यांनी दिलेली उत्तम साथ याच्या जोरावर भारतीय संघानं दुबईच मैदान मारत विक्रमी विजयासह फायनलममध्ये दाबात एन्ट्री मारलीये.

Web Title: ICC Champions Trophy 2025 IND vs AUS 1st Semi Final Virat Kohli Master Class Show KL Rahul Hardik Pandya Finishing Touch India Defeats Australia Enters Final In Dubai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.