चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील भारत-पाकिस्तान यांच्यातील हायहोल्टेज सामना रविवारी, २३ फेब्रुवारीला दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. हे दोन संघ मैदानात उतरतात त्यावेळी दोन्ही देशांतील क्रिकेट चाहत्यांशिवाय जगभरातील क्रिकेट प्रेमींच्या नजरा या सामन्यावर खिळलेल्या असतात. ट्रॉफी जिंकली नाही तरी चालेल, पण भारत-पाक मेगा लढतीत पराभव पदरी पडू नये, अशी आशा प्रत्येक भारतीय चाहत्यांची टीम इंडियाकडून तर पाक चाहत्यांना त्यांच्या टीमकडून असते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
माजी भारतीय क्रिकेटर म्हणतो, पाकिस्तान संघानं जिंकावा सामना!
पण या लढतीसंदर्भात भारताच्या माजी क्रिकेटरनं आश्चर्यकारक कमेंट केलीये. भारताविरुद्धचा सामना पाकिस्तानच्या संघानं जिंकावा, असे मत माजी भारतीय दिग्गजानं व्यक्त केले आहे.कोण आहे तो क्रिकेटर ज्याला भारताविरुद्ध पाकिस्तान संघानं जिंकावे असे वाटते? अस हा क्रिकेट का म्हणाला जाणून घेऊयात सविस्तर
कोण आहे तो माजी क्रिकेटर अन् कोणत्या उद्देशानं तो असं म्हणाला?
भारत-पाकिस्तान यांच्यातील लढतीसंदर्भात मत व्यक्त करताना माजी क्रिकेट अतुल वासन यांनी कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानने हा सामना जिंकावा, असे मत व्यक्त केले आहे. या क्रिकेटरच वक्तव्य अनेकांना आश्चर्यचकित करणारे असले तरी त्यामागचा हेतू हा स्पर्धा आणखी रंगदार व्हावी, असा आहे. भारतासह 'अ' गटात असलेल्या पाकिस्तानच्या संघानं सलामीच्या लढतीत न्यूझीलंड विरुद्धचा सामना ६० धावांनी गमावला आहे. जर भारतीय संघाविरुद्ध त्यांना पराभवाचा सामना करावा लागला तर चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील त्यांचा प्रवास जवळपास संपुष्टात येईल. याउलट जर पाकिस्तानने बाजी मारली तर 'अ' गटात तगडी स्पर्धा पाहायला मिळेल, असे माजी क्रिकेटरला वाटते.
भारत-पाक लढतीसंदर्भात नेमकं काय म्हणाला भारताचा माजी क्रिकेटर?
माजी क्रिकेटर अतुल वासन एएनआयला म्हणाला की, "मला वाटते की, पाकिस्तान संघानं हा सामना जिंकावा. कारण ते जिंकले तर स्पर्धेत रंगत पाहायला मिळेल. जर तुम्ही पाकिस्तान जिंकू दिले नाही तर स्पर्धेतील ट्विस्टच पाहायला मिळणार नाही. जर पाकिस्तानचा संघ जिंकला मजा येईल. बरोबरीची लढाई व्हायला हवी."
भारतीय संघाच्या रणनितीवरही केलं भाष्य
माजी भारतीय क्रिकेटरनं चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी निवडलेल्या भारतीय संघाचेही विश्लेषण केले आहे. भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये मजबूत बॅटिंग ऑर्डर पाहायला मिळते. दुबईच्या खेळपट्टीवर संघात फिरकीपटूंचा केलेला भरणा एकदम योग्य रणनितीचा भाग आहे, असेही या दिग्गजाने म्हटले आहे. पाकिस्तानच्या संघानं जिंकावे, ही अशी इच्छा व्यक्त केली असली तरी या दिग्गजाने स्पर्धेत भारतीय संघाला तोड नाही, असेही म्हटले आहे.
Web Title: ICC Champions Trophy 2025 IND vs PAK I want Pakistan to win Ex India star's bizarre wish for India vs Pakistan Champions Trophy clash
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.