Join us

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा; या १५ खेळाडूंना मिळालं दुबईचं तिकीट

या १५ खेळाडूंना मिळालं दुबईच तिकीट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी असा आहे भारतीय संघ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 15:15 IST

Open in App

ICC Champions Trophy 2025 India Squad : बीसीसीआयनं (BCCI) चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी भारतीय संघाची (Team India Squad For ICC Champions Trophy ) घोषणा केली आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांच्यात बीसीसीआय कार्यालयात जवळपास दोन ते तीन तास प्रदिर्घ चर्चेनंतर १५ सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली.  जसप्रीत बुमराहच्या फिटनेसचा रिपोर्ट येताच टीम इंडियाचा संघ जाहीर कण्यात आला. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी भारतीय संघात मोहम्मद शमीचीही एन्ट्री झाली आहे. पण दुसऱ्या बाजूला मोहम्मद सिराजला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालीच टीम इंडियात उतरणार मैदानात, शुबमन गिल उप कॅप्टन

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालीच भारतीय संघ मिनी वर्ल्ड कप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत खेळताना दिसेल. शुबमन गिल याच्यावर उप कॅप्टन्सीची जबाबदारी सोपवण्यात आलीये.  रिषभ पंत, लोकेश राहुल आणि संजू सॅमसन या तिघांपैकी विकेट किपरच्या रुपात कुणाला पसंती देण्यात येणार ? हा मुद्दा चांगलाच चर्चेत होता. या तिघांतून संजूचा पत्ता कट झालाय. 

बुमराहसह कुलदीप-शमीही फिट 

स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादवसह मोहम्मद शमी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी फिट आहेत का?  विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत दमदार कामगिरी करणाऱ्या करुण नायरला टीम इंडियात कमबॅकची संधी मिळणार का? असे अनेक प्रश्न क्रिकेट चाहत्यांच्या मनात होते. यात बुमराह, कुलदीप यादव आणि शमीसंदर्भात दिलासा देणारी बातमी मिळाली. मोहम्मद शमी २०२३ च्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर पुन्हा एकदा वनडे संघात खेळताना दिसेल. दुसरीकडे करुण नायरचा मात्र विचार झालेला दिसत नाही.   

या १५ खेळाडूंना मिळालं दुबईच तिकीट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी असा आहे भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उप-कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पांड्या, अक्षेर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशस्वी जैस्वाल, रिषभ पंत, रवींद्र जडेजा.

 

टॅग्स :चॅम्पियन्स ट्रॉफी