Join us

गोलंदाजीवर 'आउट' करायला नाही जमलं! मग ब्रेसवलनं त्याला भारी कॅच घेत तंबूत धाडलं (VIDEO)

शांतोला ब्रेसवेलच्या सर्वोत्तम फिल्डिंगमुळे तंबूत परतण्याची वेळ आली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 20:50 IST

Open in App

चॅम्पियन्स ट्रॉफी  स्पर्धेतील रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर रंगलेल्या बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात न्यूझीलंडच्या ताफ्यातील मायकेल ब्रेसवेल (Michael Bracewell) याने गोलंदाजीसह क्षेत्ररक्षणा वेळी कमालीची अन् लक्षवेधी कामगिरी केली. बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात फिरकीची जादू दाखवत त्याने आपल्या संघाकडून चार विकेट्स घेतल्या. या विकेट्ससह त्याने वनडे फोर विकेट्स हॉलच्या खास क्लबमध्ये एन्ट्री मारली. गोलंदाजीशिवाय मॅचला टर्निंग पॉइंट देणारा एक उत्तम कॅच त्याने टिपला. त्याने घेतलेला हा कॅच स्पर्धेतील सर्वोत्तम कॅचपैकी एक आहे.

जो एकटा नडला, त्याला ब्रेसवेलनं बेस्ट कॅचसह माघारी धाडलं

रावळपिंडीच्या मैदानात पहिल्यांदा बॅटिंग करताना बांगलादेशच्या ताफ्यातील नावाजलेल्या फलंदाजांनी नांगी टाकल्यावर कॅप्टन नजमुल हुसेन शांतो (Najmul Hossain Shanto) याने सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेतली होती. बांगलादेशच्या डावातील ३८ व्याषटकात शांतोनं एक मोठा  फटका खेळण्याचा प्रयत्न केला. यावेळी मिडविकेटला फिल्डिंग करत असलेल्या ब्रेसवेलनं उंच हवेत गेलेल्या चेंडूवर भिरभिरती नजर ठेवत अखेरच्या क्षणी उडी मारून एक अप्रतिम झेल टिपला.  

न्यूझीलंडसाठी खूप महत्त्वाचा होता हा कॅच, कारण... उंच हवेत उडालेला कॅच हा फ्लाइट कॅचच्या तुलनेत कधीही कठीण असतो. त्यात ब्रेसवेल याला धावत जाऊन तो कॅच कव्हर करावा लागला. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर नजर ठेवून अखेर त्याने झेल टिपत धोकादायक ठरणाऱ्या गड्याला तंबूचा रस्ता दाखवला. न्यूझीलंडच्या  संघासाठी ही विकेट खूपच महत्त्वाची होती. कारण बांगलादेशचा कर्णधार ७७ धावांवर बाद झाला होता. तो चांगलाच सेट झाला होता. मोठी खेळी करण्याच्या मूडमध्ये असलेल्या शांतोला ब्रेसवेलच्या सर्वोत्तम फिल्डिंगमुळे तंबूत परतण्याची वेळ आली.

गोलंदाजीत 'चौकार'

कॅचशिवाय ब्रेसवेल बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात चार विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या. वनडेत त्याने दुसऱ्यांदा ही कामगिरी करून  दाखवलीये. तो आाता इश सोधी, मिचेल सँटनर या दोन फिरकीपटूंच्या पंक्तींत सामील झालाय. न्यूझीलंडकडून या दोघांनीही वनडेत दोन वेळा ४ विकेट्सची कामगिरी करून दाखवली आहे. या यादीत सर्वात टॉपला आहे तो डॅनिएल व्हिक्टोरी आहे. त्यानेे ९ वेळा चार विकेट्सचा डाव साधला आहे. 

टॅग्स :चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५न्यूझीलंडबांगलादेश