Champions Throphy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चं यजमानपद पाकिस्तान (Pakistan) भूषवणार आहे. यानंतर यावर इंटरनॅशनल क्रिकेट काऊन्सिलनं मोठं वक्तव्यही कलं. एका दशकापेक्षा अधिक काळापर्यंत पाकिस्तानात खेळण्यास संघांना हरकत होती, परंतु आता या जागतिक स्पर्धेसाठी कोणतीही हरकत असणार नाही असा भरवसा आयसीसीनं व्यक्त केला आहे. गेल्या आठवड्यातच आयसीसीनं पाकिस्तानला २०२५ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या यजमानपदासाठी अधिकार दिले. दरम्यान, यामुळे तब्बल दोन दशकांनंतर पाकिस्तानात मोठी स्पर्धा खेळवली जाणार आहे. यापूर्वी १९९६ मध्ये पाकिस्तानात विश्वचषक स्पर्धेच्या रूपात आयसीसीच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं.
२००९ साली लाहोरमध्ये श्रीलंकन टीमच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानात आंतरराष्ट्रीय सामने खेळवण्यात आले नव्हते. आम्ही आतापर्यंत जे पाहिलंय त्यानुसार या ठिकाणी संघ खेळण्यास जातील. अनेक वर्षांनंतर पाकिस्तानात आयसीसीच्या क्रिकेट स्पर्धा भरवल्या जात आहेत. देल्या काही आठवड्यात जे काही झालं ते सोडून कोणत्याही मुद्द्याशिवाय हे पुढे जात असल्याची प्रतिक्रिया आयसीसीचे अध्यक्ष ग्रेग बार्कले यांनी मीडिया राऊंडटेबलदरम्यान पीटीआय भाषानं विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली.
न्यूझीलंड, इंग्लंडच्या संघांचाही यापूर्वी नकार यावर्षी सप्टेंबर महिन्यात न्यूझीलंड आणि इंग्लंडच्या संघांनी सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानमध्ये खेळवल्या जाणाऱ्या द्विपक्षीय मालिकेतून माघार घेतली होती. जर आयसीसीला वाटलं असतं की पाकिस्तान या स्पर्धेचं यशस्वीरित्या आयोजन करू शकणार नाही तर याचं यजमानपद त्यांना दिलं नसतं, असंही बार्कले यांनी सांगितलं.
भारताच्या सहभागाबद्दल प्रश्नचिन्ह
या स्पर्धेमध्ये भारताच्या सहभागावर प्रश्नचिन्ह आहे. भारतात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्गी देशांमध्ये कोणत्याही द्विपक्षीय क्रिकेट सामन्यांचं अनेक वर्षांपासून आयोजन झालेलं नाही. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताच्या सहभागाबद्दल येणाऱ्या काळात निर्णय घेण्यात येईल. आंतरराष्ट्रीय संघांसाठी शेजारी देशाचा दौरा करण्यासाठी अनेक सुरक्षेचे मुद्दे आहेत, असं क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले होते. दरम्यान, यावर बार्कले यांनी प्रतिक्रिया देत हा आव्हानात्मक मुद्दा असून क्रिकेटमुळे दोन्ही देशांतील संबंधांमध्ये सुधारणा होऊ शकतील असं म्हटलं.
Web Title: ICC comfortable and confident 2025 Champions Trophy will take place in Pakistan
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.