WTC Final साठीच्या India - Australia च्या संघांची अंतिम यादी जाहीर; भारतीय संघात बदल

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. ७ ते ११ जून या कालावधीत लंडनमधील ओव्हल मैदानावर हा ऐतिहासिक सामना होणार आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2023 08:23 PM2023-05-28T20:23:07+5:302023-05-28T20:24:12+5:30

whatsapp join usJoin us
ICC confirms that Team India's and Australia's final 15-member squads and their standby players for WTC Final. | WTC Final साठीच्या India - Australia च्या संघांची अंतिम यादी जाहीर; भारतीय संघात बदल

WTC Final साठीच्या India - Australia च्या संघांची अंतिम यादी जाहीर; भारतीय संघात बदल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. ७ ते ११ जून या कालावधीत लंडनमधील ओव्हल मैदानावर हा ऐतिहासिक सामना होणार आहे. त्यासाठी दोन्ही संघांच्या १५ सदस्यीय संघांची अंतिम यादी ICC ने आज जाहीर केली आहे. दोन्ही संघांनी ICC कडे त्यांच्या अंतिम संघाची यादी सोपवली आणि त्यानुसार भारताच्या संघात काही बदल पाहायला मिळतोय. ऑस्ट्रेलियाने या सामन्यासाठी १७ सदस्यीय संघ जाहीर केला होता, परंतु त्यांनी दोन खेळाडू कमी केले आहेत. 


अनुभवी गोलंदाज जोश हेझलवूड ऑस्ट्रेलियाच्या अंतिम १५ जणांच्या संघात कायम आहे. ऑस्ट्रेलियाच्या राखीव खेळाडूंमध्ये अष्टपैलू मिचेल मार्श आणि मॅट रेनशॉ यांचा समावेश होता. जॉश इंग्लिस आणि नॅथन लाएन यांच्यासह टॉड मर्फी यांचाही संघात समावेश केला गेला आहे. भारताच्या १५ सदस्यीय संघात बदल झालेला नाही. लोकेश राहुलने दुखापतीमुळे आधिच माघार घेतली होती. राखीव फळीत यशस्वी जैस्वालचा समावेश केला गेला आहे. त्याने आयपीएलमध्ये १४ सामन्यांत ६२५ धावा चोपल्या आहेत. ऋतुराज गायकवाडच्या जागी यशस्वी लंडनला रवाना झाला आहे. 


ऑस्ट्रेलियाचा संघ - पॅट कमिन्स ( कर्णधार), स्कॉट बोलंड, अॅलेक्स केरी ( यष्टिरक्षक), कॅमेरून ग्रीन, मार्कस हॅरिस, जॉश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जॉश इंग्लिस ( यष्टिरक्षक), उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लाएन, टॉड मर्फी, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर ( Australia squad: Pat Cummins (c), Scott Boland, Alex Carey (wk), Cameron Green, Marcus Harris, Josh Hazlewood, Travis Head, Josh Inglis (wk), Usman Khawaja, Marnus Labuschagne, Nathan Lyon, Todd Murphy, Steve Smith (vc), Mitchell Starc, David Warner) राखीव खेळाडू - मिचेल मार्श व मॅथ्यू रॅनशो ( Standby players: Mitch Marsh, Matthew Renshaw)


भारताचा संघ - रोहित शर्मा ( कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत ( यष्टिरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, इशान किशन ( India squad: Rohit Sharma (c), Shubman Gill, Cheteshwar Pujara, Virat Kohli, Ajinkya Rahane, KS Bharat (wk), Ravichandran Ashwin, Ravindra Jadeja, Axar Patel, Shardul Thakur, Mohd. Shami, Mohd. Siraj, Umesh Yadav, Jaydev Unadkat, Ishan Kishan (wk)) राखीव खेळाडू - यशस्वी जैस्वाल, मुकेश कुमार, सूर्यकुमार यादव ( Standby players: Yashasvi Jaiswal, Mukesh Kumar, Suryakumar Yadav)

Web Title: ICC confirms that Team India's and Australia's final 15-member squads and their standby players for WTC Final.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.