ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानच्या गोलंदाजांना बेक्कार चोपले, बाबर आजमचे गोलंदाज रडकुंडीला आले

ICC Cricket World Cup Warm-up Matches AUS vs PAK : ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या सराव सामन्यात आज पाकिस्तानच्या गोलंदाजांनी धुलाई केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2023 05:47 PM2023-10-03T17:47:05+5:302023-10-03T17:51:32+5:30

whatsapp join usJoin us
ICC Cricket World Cup Warm-up Matches AUS vs PAK : What a finish to the innings from Cameron Green and Josh Inglis! Australia finish with 7-351  | ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानच्या गोलंदाजांना बेक्कार चोपले, बाबर आजमचे गोलंदाज रडकुंडीला आले

ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानच्या गोलंदाजांना बेक्कार चोपले, बाबर आजमचे गोलंदाज रडकुंडीला आले

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC Cricket World Cup Warm-up Matches AUS vs PAK : ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या सराव सामन्यात आज पाकिस्तानच्या गोलंदाजांनी धुलाई केली. जगातील सर्वात भेदक गोलंदाजांची फौज म्हणून मिरवणाऱ्या पाकिस्तानी गोलंदाजांना आज कांगारूंनी रडकुंडीला आणले. डेव्हिड वॉर्नरने धमाकेदार सुरूवात करून दिल्यानंतर ग्लेन मॅक्सवेल, मार्नस लाबुशेन, जोश इंग्लिश व कॅमेरून ग्रीन यांनी बाबर आजमच्या गोलंदाजांना चोपून काढले.


वॉर्नर आणि मिचेल मार्श यांनी स्फोटक सुरूवात करून दिली. यांची ८३ धावांची भागीदारी उसमान मीरने तोडली. वॉर्नर ३३ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ४८ धावांवर माघारी परतला. त्यानंतर मीरने पुढच्या षटकात मार्शला ( ३१) माघारी पाठवले. स्टीव्ह स्मिथ ( २१) व लाबुशेन ( ४०) यांनी संयमी खेळ करताना ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. अॅलेक्स केरी ( ११) अपयशी ठरला असला तरी ग्लेन मॅक्सवेल कडाडला. त्याने ४ चौकार व ६ षटकारांच्या मदतीने ७७ धावा केल्या.


कॅमेरून ग्रीन व इंग्लिस यांनी सातव्या विकेटसाठी ५१ चेंडूंत ८३ धावांची भागीदारी केली. इंग्लिसच्या उलट्या-सुलट्या फटक्यांनी हॅरीस रौफही हैराण झालेला पाहायला मिळाला. त्याने ३० चेंडूंत ८ चौकार १ षटकारांसह ४८ धावा केल्या. ग्रीनने नाबाद ५० धावा करून ऑस्ट्रेलियाला ७ बाद ३५१ धावांपर्यंत पोहोचवले.  

Web Title: ICC Cricket World Cup Warm-up Matches AUS vs PAK : What a finish to the innings from Cameron Green and Josh Inglis! Australia finish with 7-351 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.