ICC Cricket World Cup Warm-up Matches IND vs NED : वन डे वर्ल्ड कप स्पर्धा ५ ऑक्टोबरपासून सुरू होतेय आणि भारताचा पहिला सामना ८ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. त्यापूर्वी भारताला दोन सराव सामने खेळायचे होते आणि त्यापैकी गुवाहाटीचा सामना ( वि. इंग्लंड) पावसामुळे रद्द झाला. आज विशाखापट्टणम येथे नेदरलँड्सविरुद्ध दुसरा सराव सामना भारताला खेळायचा आहे, परंतु त्यातही पावसाने खोडा घातला आहे. दुपारी २ वाजता सुरू होणारा सामना अजूनही सुरू झालेला नाही आणि २.४५ वाजता पाऊस थांबल्याचे अपडेट्स समोर आले आणि त्यानंतर सर्व कव्हर्स हटवण्यात आले, परंतु पुन्हा जोरदार पाऊस सुरू झाला आणि अखेर हा सामना रद्द करावा लागला.
भारताने आशिया चषक जिंकून वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीची झलक सर्वांना दाखवून दिली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धची वन डे मालिका २-१ अशी जिंकली. पण, त्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांत रोहित, विराट यांना विश्रांती दिली गेली होती. या अनुभवी खेळाडूंना वर्ल्ड कप पूर्वी सराव मिळावा यासाठी हे दोन सराव सामने महत्त्वाचे होते, परंतु इंग्लंडविरुद्धचा सामना पावसामुळे वाया गेला. आता विशाखापट्टणम येथे मागील १६ तासांपासून पाऊस पडतोय. त्यामुळे मैदान ओलं झालं आहे. आता मैदानावर सुपर सॉकर फिरवण्यात येतोय आणि ग्राऊंड्समनही प्रयत्न करत होते.
खेळपट्टीवरील कव्हर्सही काढण्यात आले आणि आता सामना सुरू होईल असे वाटत असताना पुन्हा मुसळधार पाऊस सुरू झाला त्यामुळे सामना रद्द करावा लागला. वर्ल्ड कप पूर्वी भारताचे दोन्ही सराव सामना रद्द झाले.
वर्ल्ड कप साठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उप कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव.
Web Title: ICC Cricket World Cup Warm-up Matches IND vs NED : India vs Netherlands match has been abandoned due to rain.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.