Join us  

PAK vs NZ : भारतीय वंशांच्या राचिन रविंद्रने पाकिस्तानला धू धू धुतलं; पठ्ठ्याने संधीचं सोनं केलं 

ICC Cricket World Cup Warm-up Matches PAK vs NZ : पाकिस्तानच्या ३४५ धावांचा पाठलाग करायला मैदानावर उतरलेल्या न्यूझीलंडकडून दमदार खेळ झाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2023 8:41 PM

Open in App

ICC Cricket World Cup Warm-up Matches PAK vs NZ : वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वीच्या सराव सामन्यात पाकिस्तानच्या ३४५ धावांचा पाठलाग करायला मैदानावर उतरलेल्या न्यूझीलंडकडून दमदार खेळ झाला. भारतीय वंशाचा रचिन रविंद्रला ( Rachin Ravindra) याला किवींनी सलामीला पाठवले आणि तो कमाल करून गेला. डेव्हॉन कॉनवे शुन्यावर माघारी परतल्यानंतर राचिन व कर्णधार केन विलियम्सन यांनी दीडशतकी भागीदारी केली. ६ महिन्यानंतर दुखापतीतून सावरलेल्या केनने ५० चेंडूंत ५४ धावा करून रिटायर्ड हर्ट होण्याचा निर्णय घेतला. पण, राचिनने पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई केली. रचिनला शतकापासून ३ धावांनी वंचित रहावे लागले. आघा सलमानने त्याचा त्रिफळा उडवला. राचिनने ७२ चेंडूंत १६ चौकार व १ षटकारासह ९७ धावा केल्या. न्यूझीलंडच्या २३.१ षटकांत २ बाद १८३ धावा झाल्या.  

कोण आहे रचिन ?

राचिनचे वडिल रवी कृष्णमूर्ती हे मुळचे बंगळुरुचे, तर त्याच्या आईचे नाव दीपा कृष्णमूर्ती. बऱ्याच वर्षांपासून ते न्यूझीलंडमध्येच आहेत. राचिनचा जन्मही न्यूझीलंडमधील वेलिंग्टनचा आहे. रवि कृष्णमूर्ती हे बंगळुरू येथील सॉफ्टवेअर सिस्टम आर्किटेक्ट होते. न्यूझीलंडमधील हट हॉक्स क्लबचे संस्थापक रवींद्र यांचे वडील रवी कृष्णमूर्ती १९९० च्या दशकाच्या सुरुवातीला भारतातून स्थलांतरित झाले आणि न्यूझीलंडमध्ये स्थायिक झाले.  

कृष्णमूर्ती त्यांच्या कामानिमित्त ९० च्या दशकात न्यूझीलंडला गेले होते. राचिनच्या वडिलांना क्रिकेटमध्ये खूप रस होता आणि त्यांनी वेलिंग्टनमध्ये स्वतःचा क्रिकेट क्लबही सुरू केला होता. सचिन तेंडुलकर   आणि राहुल द्रविडचे  चाहते असलेल्या राचिनच्या वडिलांनी या भारतीय दिग्गजांच्या नावांची अक्षरे मिसळून आपल्या मुलाचे नाव 'राचिन' ठेवले.

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपन्यूझीलंडपाकिस्तान