यंदाच्या आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचं यजमानपद भूषवणाऱ्या भारतासाठी स्पर्धेची अखेर निराशाजनक झाली. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम फेरीत पराभव झाल्याने भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. पुन्हा एकदा क्रिकेट विश्वचषकाने हुलकावणी दिल्याने आता भारतीय क्रिकेटप्रेमींना पुढच्या क्रिकेट विश्वचषकाबाबत उत्सुकता लागली आहे. पुढील क्रिकेट विश्वचषक स्पर्धा ४ वर्षांनी २०२७ मध्ये खेळवली जाणार आहे. ही स्पर्धा दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया या देशांमध्ये संयुक्तरीत्या खेळवली जाणार आहे.
२०२७ मध्ये दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वेमध्ये होणाऱ्या या विश्वचषक स्पर्धेत १४ संघ खेळणार आहेत. दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे हे यजमान असल्याने हे संघ स्पर्धेसाठी थेट पात्र ठरतील. तर आयसीसीच्या एकदिवसीय क्रमावारीमध्ये पहिल्या आठ क्रमांकावरील संघही या स्पर्धेसाठी थेट पात्र ठरतील. तर उर्वरित ४ संघ हे पात्रता फेरीमधून निवडले जातील.
आफ्रिका खंडातील नामिबीयाचा संघही या स्पर्धेचा सहजनमान असेल. मात्र त्याच्या सहभागाबाबत निश्चिती नाही आहे. त्याचं कारण म्हणजे नामिबिया हा अद्याप आयसीसीचा पूर्ण सदस्य बनलेला नाही. म्हणजेच नामिबियाला स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पात्रता निकषांचं पालन करावं लागेलय नामिबियाचा संघ २००३ च्या वर्ल्डकपमध्ये खेळला होता. त्यानंतर त्यांना क्रिकेट विश्वचषकासाठी पात्र ठरता आलेले नाही.
२०२७ ची विश्वचषक स्पर्धा ही २०१९ आणि २०२३ च्या विश्वचषक स्पर्धांपेक्षा वेगळी असेल. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या १४ संघांना दोन गटात विभागलं जाईल. प्रत्येक गटात ७ गट असतील. त्यातील पहिले ३ संघ हे सुपर सिक्स फेरीसाठी पात्र ठरतील. त्यातील चार संघ उपांत्य फेरीत जातील. त्यानंतर उपांत्य आणि अंतिम सामने खेळवले जातील. या आधी १९९९ आणि २००३ च्या वर्ल्डकपमध्ये या प्रकारे सामने खेळवले गेले होते. २०२७ च्या वर्ल्डकपमध्ये पॉईंट्स कॅरीफॉरवर्डची सुधारीत आवृत्ती सादर केली जाणार आहे. १९९९ च्या वर्ल्डकपमध्ये या पद्धतीचा अवलंब केला गेला होता.
तर २०२३ नंतर आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेनंतर २०३१ मध्ये भारतात पुन्हा एकदा वनडे वर्ल्डकप होणार आहे. त्यावेळी भारत आणि बांगलादेश हे संयुक्तरीत्या वर्ल्डकपचं यजमानपद भूषवणार आहेत.
Web Title: ICC Cricket World Cup: Where and when is the next Cricket World Cup? How many teams will play, when India will host again
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.