Join us  

...म्हणून रोहित शर्मा वापरतो ४५ क्रमांकाची जर्सी, शाळेतील शिक्षकांनी उलगडलं गुपित

Rohit Sharma: बुधवारी होणाऱ्या पहिल्या उपांत्य सामन्यात भारताची गाठ न्यूझीलंडशी पडणार आहे. या सामन्यापूर्वी भारताचा कर्णधार रोहित शर्माबाबत रंजक माहिती समोर आली आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2023 10:14 PM

Open in App

यंदाच्या आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या भारतीय संघ जबरदस्त खेळ करत आहे. साखळी फेरीतील  सर्वच्या सर्व सामने जिंकत टीम इंडियाने स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. आता बुधवारी होणाऱ्या पहिल्या उपांत्य सामन्यात भारताची गाठ न्यूझीलंडशी पडणार आहे. या सामन्यापूर्वी भारताचा कर्णधार रोहित शर्माबाबत रंजक माहिती समोर आली आहे. 

रोहित शर्मा ४५ क्रमांकाची जर्सी का वापरतो. याबाबतचं गुपित त्याच्या शाळेतील शिक्षकांनी उलगडून सांगितलं आहे. रोहित शर्माचे शाळेतील शिक्षक योगेश पटेल म्हणाले की, रोहित क्रिकेटबाबत खूप आक्रमक होता, पण आता तो खूप शांत झाला आहे. रोहितच्या जर्सीबाबत म्हणाले की, एका अंकशास्त्रज्ञाने त्याला सांगितले होते की, ९ हा अंक तुमच्या आयुष्यात खूप भाग्यवान आहे. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही १८, २७ क्रमांक, ५४ क्रमांकाची जर्सी घालू शकता. परंतु ४५ क्रमांक अधिक शुभ असेल. त्या दिवसापासून रोहित शर्माने जर्सी घालायला सुरुवात केली. त्याच्या जर्सीचा क्रमांक ४५ ठेवायला सुरुवात केली. इतकेच नाही तर त्याच्या सर्व गाड्यांचे नंबर ४५ आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. 

तर रोहित शर्माला क्रिकेटचे सुरुवातीचे धडे देणारे क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड म्हणाले की, रोहित शर्माला मी कोणतेही ब्रह्मास्त्र दिलेले नाही. त्याच्याकडे देवाने दिलेली प्रतिभा आहे.

यंदाच्या विश्वचषक स्पर्धेमध्ये रोहित शर्माने जबरदस्त फलंदाजीचं प्रदर्शन केलं असून, त्याने ९ सामन्यांमध्ये ५०३ धावा काढल्या आहेत. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा काढणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोहित शर्मा चौथ्या क्रमांकावर आहे. 

टॅग्स :रोहित शर्माभारतीय क्रिकेट संघ