ICC FTP for 2023-27 announced : ICC ने आयोजित केल्यात India vs Pakistan च्या सहा लढती; जाणून घ्या कट्टर प्रतिस्पर्धी कधी भिडणार 

ICC FTP for 2023-27 announced - आयसीसीने बुधवारी २०२२ ते २०२७ या कालावधीतील पुरुष क्रिकेट संघाचे Future Tour Program ( FTP) जाहीर केले. १२ सदस्य संघांच्या वेळापत्रकात एकूण ७७७ आंतरराष्ट्रीय सामने खेळवण्यात येणार आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 03:51 PM2022-08-17T15:51:42+5:302022-08-17T15:52:31+5:30

whatsapp join usJoin us
ICC FTP for 2023-27 announced : India's confirmed schedule (Home/Away), Six high voltage match between India and Pakistan, know the full schedule here | ICC FTP for 2023-27 announced : ICC ने आयोजित केल्यात India vs Pakistan च्या सहा लढती; जाणून घ्या कट्टर प्रतिस्पर्धी कधी भिडणार 

ICC FTP for 2023-27 announced : ICC ने आयोजित केल्यात India vs Pakistan च्या सहा लढती; जाणून घ्या कट्टर प्रतिस्पर्धी कधी भिडणार 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC FTP for 2023-27 announced - आयसीसीने बुधवारी २०२२ ते २०२७ या कालावधीतील पुरुष क्रिकेट संघाचे Future Tour Program ( FTP) जाहीर केले. १२ सदस्य संघांच्या वेळापत्रकात एकूण ७७७ आंतरराष्ट्रीय सामने खेळवण्यात येणार आहेत. त्यात १७३ कसोटी, २८१ वन डे व ३२३ ट्वेंटी-२० सामन्यांचा समावेश आहे. आताच्या FTP मध्ये ६९४ सामने खेळवण्यात आले आहेत. आयसीसीने आज जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील पुढील दोन पर्वातील वेळापत्रकही जाहीर केले आहेत.

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात १९९२ नंतर प्रथमच पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. २०२३-२५ ला ऑस्टेलियात बॉर्डक-गावस्कर ट्रॉफीसाठी चुरस रंगणार आहे, तर २०२५-२७मध्ये भारतात ही मालिका खेळवण्यात येणार आहे. भारतीय संघ १८ ऑगस्ट २०२२ ते फेब्रुवारी २०२७ पर्यंत ४४ कसोटी, ६३ वन डे व ७६ ट्वेंटी-२० सामने खेळणार आहे. भारतीय संघ एकूण ३८ कसोटी सामने खेळणार आहेत. इंग्लंड व ऑस्ट्रेलिया अनुक्रमे ४२ व ४१ कसोटी सामने खेळतील, तर  बांगलादेश व न्यूझीलंड यांच्या वाट्याला अनुक्रमे ३४ व ३२ कसोटी सामने आले आहेत. 

२०२३ पासून भारतीय संघाचे वेळापत्रक ( होम/अवे) 
India's confirmed schedule from 2023 (Home/Away)

२०२३  

  • न्यूझीलंड - ३ वन डे व ३ ट्वेंटी-२० ( जानेवारी) (H).
  • ऑस्ट्रेलिया -  ४ कसोटी व ३ वन डे ( जानेवारी ) (H).
  • वेस्ट इंडिज -  २ कसोटी, ३ वन डे, ३ ट्वेंटी-२० ( जुलै) (A).
  • ऑस्ट्रेलिया -  ३ वन डे ( सप्टेंबर) (H).
  • ऑस्ट्रेलिया -  ५ ट्वेंटी-२० ( नोव्हेंबर) (H).
  • दक्षिण आफ्रिका - २ कसोटी, ३ वन डे व ३ ट्वेंटी-२० ( डिसेंबर) (A).

 

२०२४  

  • इंग्लंड - ५ कसोटी ( जानेवारी ) (H).
  • श्रीलंका - ३ वन डे व ३ ट्वेंटी-२० ( जुलै ) (A).
  • बांगलादेश -  २ कसोटी व ३ ट्वेंटी-२० ( सप्टेंबर) (H).
  • न्यूझीलंड - ३ कसोटी ( ऑक्टोबर) (H).
  • ऑस्ट्रेलिया - ५ कसोटी ( नोव्हेंबर ) (A).

 

२०२५  

  • इंग्लंड - ३ वन डे व ५ ट्वेंटी-२० ( जानेवारी) (H).
  • इंग्लंड - ५ कसोटी ( जून) (A).
  • बांगलादेश - ३ वन डे व ३ ट्वेंटी-२० (ऑगस्ट)  (A).
  • वेस्ट इंडिज - २ कसोटी ( ऑक्टोबर) (H).
  • ऑस्ट्रेलिया - ३ वन डे व ५ ट्वेंटी-२० ( ऑक्टोबर) (A).
  • दक्षिण आफ्रिका - २ कसोटी, ३ वन डे व ५ ट्वेंटी-२० ( नोव्हेंबर) (H).

 

२०२६

  • न्यूझीलंड - ३ वन डे व ५ ट्वेंटी-२० ( जानेवारी) (H).
  • अफगाणिस्तान - १ कसोटी व ३ वन डे ( जून) (H).
  • इंग्लंड - ३ वन डे व ५ ट्वेंटी-२० ( जुलै) (A).
  • श्रीलंका - २ कसोटी ( ऑगस्ट) (A).
  • अफगाणिस्तान - ३ ट्वेंटी-२० ( सप्टेंबर) (A).
  • वेस्ट इंडिज - ३ वन डे व ५ ट्वेंटी-२० ( सप्टेंबर) (H).
  • न्यूझीलंड - २ कसोटी, ३ वन डे व ५ ट्वेंटी-२० ( ऑक्टोबर ) (A).
  • श्रीलंका - ३ वन डे, ३ ट्वेंटी-२० ( डिसेंबर )  (H).
  • ऑस्ट्रेलिया - ५ कसोटी ( जानेवारी, २०२७)(H).

 

दरम्यान, भारत-पाकिस्तान यांच्यातही सहा सामने होणार आहेत 
India-Pakistan's complete schedule from 2023-2027:

  1. सप्टेंबर २०२३ - आशिया चषक 
  2. ऑक्टोबर २०२३ - वन डे वर्ल्ड कप
  3. जून २०२४ - ट्वेंटी-२० वर्ल्ड कप ( यजमान वेस्ट इंडिज व अमेरिका) 
  4. फेब्रुवारी २०२५ - चॅम्पियन्स ट्रॉफी ( यजमान पाकिस्तान) 
  5. सप्टेंबर २०२५ - आशिया चषक 
  6. फेब्रुवारी २०२६ - ट्वेंटी-२० वर्ल्ड कप ( यजमान भारत व श्रीलंका)  

Web Title: ICC FTP for 2023-27 announced : India's confirmed schedule (Home/Away), Six high voltage match between India and Pakistan, know the full schedule here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.