नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) बुधवारी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याची तारीख जाहीर केली. ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या आवृत्तीचा अंतिम सामना 7 ते 11 जून दरम्यान लंडनमधील ओव्हल येथे (12 जून) राखीव दिवसासह खेळवला जाईल. खरं तर न्यूझीलंडने साउथॅम्प्टनमध्ये 2021 च्या फायनलमध्ये भारतीय संघाचा 8 गडी राखून पराभव करत स्पर्धेची पहिली आवृत्ती जिंकली होती.
कसोटी वर्ल्ड कप फायनलची तारीख जाहीर दरम्यान, यंदा भारतीय संघाला ICC जेतेपदाचा दुष्काळ संपवण्याची संधी असणार आहे. कारण या क्रमवारीत आताच्या घडीला ऑस्ट्रेलियाचा संघ अव्वल स्थानी आहे, तर दुसऱ्या स्थानावर भारतीय संघ स्थित आहे. त्यामुळे या दोन संघांमध्येच अंतिम सामना होण्याची अपेक्षा आहे. ऑस्ट्रेलिया 75.56 गुणांसह पहिल्या तर भारत 58.93 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. 9 फेब्रुवारीपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेचा थरार रंगणार आहे. श्रीलंकेचा संघ 53.33% आणि दक्षिण आफ्रिका 48.72% अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. श्रीलंकेचे न्यूझीलंडविरुद्ध दोन कसोटी सामने बाकी आहेत. तर दक्षिण आफ्रिका वेस्ट इंडिजविरुद्ध दोन सामन्यांची मालिका खेळणार आहे.
भारताला ICC जेतेपदाचा दुष्काळ संपवण्याची संधीवर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळणे आमच्यासाठी प्रेरणादायी असल्याचे ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने म्हटले. तर भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वात मायदेशात कांगारूच्या संघाशी भिडणार आहे. तत्कालीन कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाने न्यूझीलंडविरूद्ध अंतिम सामना खेळला होता. मात्र, आता भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी हिटमॅन रोहित शर्माच्या खांद्यावर आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"