Prize money announced for T20 World Cup 2022 : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या बक्षीस रकमेची ICC ने शुक्रवारी घोषणा केली. ऑस्ट्रेलियात १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत वर्ल्ड कप पार पडणार आहे. एडलेड, ब्रिस्बन, गिलाँग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी या सात शहरांमध्ये ४५ सामने खेळवण्यात येणार आहेत. उपांत्य फेरीचा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंड व अॅडलेड ओव्हल येथे अनुक्रमे ९ व १० नोव्हेंबरला खेळवण्यात येईल. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर १३ नोव्हेंबरला अंतिम सामना खेळवला जाईल. भारताचा पहिला सामना २३ ऑक्टोबरला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे.
ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील विजेता ऑस्ट्रेलिया, उपविजेता न्यूझीलंड यांच्यासह अफगाणिस्तान, बांगलादेश, इंग्लंड, भारत, पाकिस्तान व दक्षिण आफ्रिका यांना ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२च्या Super 12 मध्ये थेट प्रवेश मिळाला आहे. नामिबिया, स्कॉटलंड, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांना पहिल्या राऊंडमध्ये खेळावे लागेल. पहिल्या राऊंडमध्ये Super 12मधील अंतिम चार संघांसाठी एकमेकांना आव्हान देतील.
राउंड-1ग्रुप A: श्रीलंका, यूएई, नेदरलँड्स, नामीबियाग्रुप B: आयरलँड, स्कॉटलंड, झिम्बाब्वे, वेस्ट इंडिज
सुपर-12ग्रुप 1: इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूजीलंड, अफगानिस्तान, ग्रुप-A विजेता, ग्रुप-B उपविजेताग्रुप 2: भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, बांग्लादेश, ग्रुप-A उपविजेता, ग्रुप-B विजेता
T20 विश्वचषक 2022 मध्ये एकूण १६ संघ सहभागी होणार आहेत. ही टूर्नामेंट एकूण तीन टप्प्यात खेळवली जात आहे. राऊंड 1, सुपर-12 आणि प्ले-ऑफ सामने असे तीन टप्पे असतील. यातील ८ संघ सुपर-12 साठी थेट पात्र ठरले आहेत, तर उर्वरित ४ संघ पात्रता फेरी जिंकून आपले स्थान निश्चित करतील. पात्रता फेरीत ४-४ संघांचे दोन गट तयार करण्यात आले आहेत. यामध्ये आपापल्या गटातील टॉप-२ संघ सुपर-12 टप्प्यात पोहोचतील. त्यानंतर सुपर-12 मध्ये ६-६ संघांचे दोन गट असतील, ज्यामध्ये त्यांच्या गटातील टॉप-२ संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. तेथे प्लेऑफ ला सुरूवात होईल. त्यांच्यातून सर्वोत्तम दोन संघ फायनल खेळतील.
आयसीसीने जाहीर केली बक्षीस रक्कम
- विजेत्या संघाला मिळणार १.६ मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास १३ कोटी
- उप विजेत्या संघाला मिळणार ८ मिलियन डॉलर म्हणजे ६.५२ कोटी
- उपांत्य फेरीतील पराभूत संघांना प्रत्येकी ४ मिलियन डॉलर म्हणजे ३.२६ कोटी
- सुपर १२ मध्ये प्रत्येक विजयासाठी ४० हजार डॉलर म्हणजे ३२ लाख ( एकूण ९.७९ कोटी)
- सुपर १२ मध्ये आव्हान संपणाऱ्या ८ संघांना प्रत्येकी ७० हजार डॉलर म्हणजे ५७ लाख ( एकूण ४.५६ कोटी)
- पहिल्या फेरीत विजयी होणाऱ्या १२ संघांना प्रत्येकी ४० हजार डॉलर म्हणजे ३२ लाख ( एकूण ३.९१ कोटी)
- पहिल्या फेरीत पराभूत होणाऱ्या ४ संघांना प्रत्येकी ४० हजार डॉलर म्हणजे ३२ लाख ( एकूण १.३० कोटी)
- एकूण रक्कम - ४५.६६ कोटी
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"