आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) अखेर यंदा ऑस्ट्रेलियात होणारा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्थगित करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( बीसीसीआय) आयसीसीच्या या निर्णयाची चातकासारखी प्रतीक्षा पाहत होते. आता बीसीसीआयचा इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) तेरावा मोसमाचा मार्ग मोकळा झाला आहे. आशिया चषक, इंग्लंडचा भारत दौरा अन् आता ट्वेंटी-20 वर्ल्ड कपही स्थगित झाल्यामुळे बीसीसीआयला आयपीएल खेळवता येणार आहे. पण, आयसीसीनं हे जाहीर करताना बीसीसीआयसमोर एक 'गुगली' टाकली आहे. ( ICC MEN’S T20 WORLD CUP 2020 POSTPONED)
ऑस्ट्रेलियाच्या यजमानपदाखाली 18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबरदरम्यान वर्ल्ड कप होणार होता. या बैठकीत ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्थगित करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. यावेळी आयसीसीनं पुढील तीन वर्षांत होणाऱ्या पुरुषांच्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या तारखाही जाहीर केला. पण, त्यात एक ट्विस्ट ठेवलं. ( ICC MEN’S T20 WORLD CUP 2020 POSTPONED)
पुढील तीन वर्षांच्या प्रमुख स्पर्धाआयसीसी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2021 ( पुरुष) - ऑक्टोबर - नोव्हेंबर 2021, अंतिम सामना 14 नोव्हेंबर आयसीसी ट्वेंटी- 20 वर्ल्ड कप 2022 ( पुरुष) - ऑक्टोबर - नोव्हेंबर 2022, अंतिम सामना 13 नोव्हेंबरआयसीसी वन डे वर्ल्ड कप ( पुरुष) भारत 2023 - ऑक्टोबर - नोव्हेंबर 2023, अंतिम सामना 26 नोव्हेंबर
यंदाचा स्थगित झालेला वर्ल्ड कप 2022मध्ये ऑस्ट्रेलियात खेळवण्यात येईल. कारण भारताकडे 2021 मधील वर्ल्ड कपचे यजमानपद आहे. पण, असे असले तरी आयसीसीनं 2021 आणि 2022च्या वर्ल्ड कपच्या आयोजकांची नावं जाहीर केलेली नाहीत. कोरोना व्हायरसची परिस्थितीचा आढावा घेऊन त्याबाबत निर्णय घेतला जाईल. त्यांच्या या 'गुगली'मुळे बीसीसीआयची चिंता नक्की वाढली असेल. भारताचा माजी कसोटीपटू आकाश चोप्रा यानंही या गोष्टीवर आश्चर्च व्यक्त केलं. ( ICC MEN’S T20 WORLD CUP 2020 POSTPONED)
अन्य महत्त्वाच्या बातम्या
कोरोनामुळे खेळाडूंवर आली उपासमारीची वेळ; दूध खरेदी करण्यासाठीही नाहीत पैसे!
WiFi दुरुस्तीसाठी भारतीय क्रिकेटपटूच्या घरी थेट 'NASA'वरून आला व्यक्ती!
IPL 2020 च्या मार्गात आणखी एक विघ्न; BCCIने ठरवलेल्या तारखांवर ब्रॉडकास्टर नाराज, पण का?
आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूच्या वडिलांना झाला कोरोना; आईच्या रिपोर्टची प्रतीक्षा
भारतामुळे शोएब मलिकचा इंग्लंड दौरा लांबणीवर; पाकिस्तान क्रिकेट मंडळाचं ट्विट