Latest ICC T20I Rankings : आंतरारष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC) नुकत्याच जाहीर केलेल्या टी-२० क्रमवारीत पाकिस्तानचा स्टार क्रिकेटर बाबर आझमला मोठा फटका बसला आहे. दुसरीकडे आयपीएलच्या तयारीत असलेल्या भारतीय क्रिकेटपटूंचा जलवा दिसतोय. भारतात आयपीएलचा माहोल असताना पाकिस्तानचा संघ न्यूझीलंड दौऱ्यावर पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळत आहे. या मालिकेत बाबर आझमला संघात स्थान मिळालेले नाही. स्थान गमावल्याचा मोठी फटका त्याला आयसीसी क्रमवारीत झाल्याचे दिसते. तो आता आयसीसीच्या टी-२० तील फलंदाजांच्या क्रमवारीत टॉप १० मधून बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
न्यूझीलंडच्या टीम सिफर्टची उंच उडी, बाबरच्या क्रमवारीत घसरण
पाकिस्तान विरुद्धच्या टी-२० मालिकेतील सलग दोन विजयामुळे न्यूझीलंडच्या ताफ्यातील खेळाडूंना आयसीसी टी-२० क्रमवारीत चांगला फायदा झाला आहे. आफ्रिदीची धुलाई करणारा टिम सिफर्ट २० स्थानंनी झेप घेत १३ व्या स्थानावर आला आहे. दुसरीकडे पाकचा स्टार खेळाडू बाबर आझम आयसीसी टी-२० क्रमवारीत सातव्या स्थानावरुन आठव्या स्थानावर घसला आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या उर्वरित ३ टी-२० सामन्यानंतर बाबरवर टॉप १० मधून बाहेर पडण्याची वेळही येऊ शकते.
टॉप ५ मध्ये तीन भारतीय
आयसीसी टी-२० क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा ट्रॅविस हेड ८५६ गुणांसह अव्वलस्थानावर आहे. त्याच्यापाठोपाठ या यादीत अभिषेक शर्माचा नंबर लागतो. त्याच्या खात्यात ८२९ गुण जमा आहेत. इंग्लंडचा फिल सॉल्ट ८१५ गुणांसह या यादीत तिसऱ्या स्थानावर असून त्यानंतर चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर तिलक वर्मा (८०४ रेटिंग पॉइंट्स) आणि सूर्यकुमार यादव (७३९ रेटिंग पॉइंट्स) यांचा नंबर लागतो.
टॉप १० मधील अन्य खेळाडू
इंग्लंडचा जोस बटलर ७३५ रेटिंग पॉइंट्ससह या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे. श्रीलंकेच्या पथुम निसंका याने बाबर आझमच्या जागेवर कब्जा करत सातव्या क्रमांकावर झेप घेतलीये. या दोघांशिवाय लंकेचा कुसल परेरा आणि दक्षिण आफ्रिकेचा रीझा हेंड्रिक्स आघाडीच्या दहामध्ये आहेत. टीम सेफर्ट सध्याच्या घडीला टॉप १० बाहेर असला तरी आणि बाबर आझम आणि त्याच्यात फक्त ६३ पॉइंट्सचा फरक आहे.