ICCची मोठी घोषणा; 30 जुलैपासून सुरू होणार 2023च्या वर्ल्ड कपची पात्रता स्पर्धा

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) सोमवारी मोठी घोषणा केली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2020 02:13 PM2020-07-27T14:13:29+5:302020-07-27T14:15:06+5:30

whatsapp join usJoin us
ICC launches Super League qualification pathway for 2023 ODI World Cup in India | ICCची मोठी घोषणा; 30 जुलैपासून सुरू होणार 2023च्या वर्ल्ड कपची पात्रता स्पर्धा

ICCची मोठी घोषणा; 30 जुलैपासून सुरू होणार 2023च्या वर्ल्ड कपची पात्रता स्पर्धा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कोरोना व्हायरसच्या संकटात इंग्लंड-वेस्ट इंडिज मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन झाले. त्यामुळे क्रिकेटचाहत्यांमध्ये उत्साह संचारला आहे. आता कसोटी मालिकेनंतर ट्वेंटी-20, त्यानंतर पाकिस्तानविरुद्ध कसोटी व ट्वेंटी-20 मालिका, इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल) या सर्व स्पर्धा लागोपाठ होणार असल्यानं क्रिकेटप्रेमींची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. त्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) सोमवारी मोठी घोषणा केली. 2023चा वर्ल्ड कप भारतात होणार आहे आणि त्यासाठीच्या पात्रता स्पर्धेची घोषणा आज आयसीसीनं केली. 

भारताचा माजी कर्णधार करतोय दगड फोडण्याचं काम; Sonu Soodनं पुढं केला मदतीचा हात!

यजमान भारत आणि जागतिक क्रमवारीत अव्वल सात स्थानांवर असलेले संघ 2023च्या वर्ल्ड कपसाठी थेट पात्र ठरणार आहेत. त्यामुळे उर्वरित जागांसाठी पात्रता स्पर्धा होणार आहे. इंग्लंड आणि आयर्लंड यांच्यात 30 जुलैपासून सुरू होणाऱ्या स्पर्धेपासून या पात्रता स्पर्धेची सुरुवात होणार आहे. ''पुढील तीन वर्षांसाठी होणाऱ्या वन डे क्रिकेट सामन्यांतून 2023च्या वर्ल्ड कप स्पर्धेतील उर्वरित संघ ठरणार आहेत,''असे आयसीसीच्या जॉफ अॅलार्डिस यांनी सांगितले. ( England v Ireland to kick off World Cup Super League on July 30)

या स्पर्धेत एकूण 13 संघ सहभागी होणार आहेत. 2015-17च्या वर्ल्ड क्रिकेट सुपर लीग जिंकणाऱ्या नेदरलँड्ससह या स्पर्धेत आयसीसीच्या 12 सदस्यीय संघांचा समावेश असणार आहे. प्रत्येक संघ घरच्या मैदानावर आणि परदेशात तीन सामन्यांची प्रत्येकी 4-4 मालिका खेळतील. यातून दोन संघच वर्ल्ड कप खेळू शकतील. ''मागील आठवड्यात आम्ही 2023चा वर्ल्ड कप सहा महिन्यांनी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पात्रता स्पर्धांना अधिक वेळ मिळणार आहे,'' असेही अॅलार्डिस यांनी सांगितले. ( England v Ireland to kick off World Cup Super League on July 30)

प्रत्येक संघाला विजयासाठी 10 गुण, तर बरोबरी किंना अनिर्णित किंवा रद्द झालेल्या सामन्यातासठी प्रत्येकी 5-5 गुण दिले जातील. आठ मालिकांमधील गुणांनुसार संघांची क्रमवारी ठरवण्यात येईल. 


 

Fact Check : IPL 2020चं वेळापत्रक जाहीर? जाणून घ्या व्हायरल झालेल्या PDFचं सत्य

सौरव गांगुलीचा बीसीसीआय अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपला; आता पुढे काय?

बीसीसीआयनं माझ्याशी असं वागायला नको होतं; युवराज सिंगनं व्यक्त केली खंत

ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या कॅरोलिना मारिनच्या वडिलांचे निधन

Web Title: ICC launches Super League qualification pathway for 2023 ODI World Cup in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.