दुबई : कोरोना महामारीदरम्यान साऊथम्पटन कसोटीसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटला पुन्हा सुरुवात झाली. सर्वांची नजर आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धेच्या निर्णयावर आहे. दरम्यान, आॅस्ट्रलियाने महामारी व आर्थिक अडचणीमुळे स्पर्धेचे यजमानपद भूषविण्यास असमर्थता व्यक्त केली आहे. त्याचसोबत त्यांनी यंदा होणाऱ्या द्विपक्षीय क्रिकेट मालिकांची घोषणा केली आहे. त्यात भारताविरुद्ध होणाºया मालिकेचाही समावेश आहे.
आयसीसीने आतापर्यंत टी२० विश्वचषक स्पर्धेच्या भविष्याबाबत कुठलाही निर्णय घेतलेला नाही. गेल्या तीन महिन्यात आयसीसीच्या दोन बैठका झाल्या, पण ‘वेट अॅन्ड वॉच’ला प्राधान्य देण्यात आले. या महिन्याच्या सुरुवातीला आयसीसीचे माजी अध्यक्ष शशांक मनोहर यांनी राजीनामा दिल्यानंतर आता आशा उंचावल्या आहेत. एका वृत्तसंस्थेच्या हवाल्याने माहिती मिळाली की, आयसीसीची बैठक पुढील आठवड्यात होईल. बैठकीच्या तारखेबाबत मात्र कुठलीही माहिती मिळाली नाही. याबाबत आयसीसीच्या सूत्राने सांगितले की, कुठली तारीख निश्चित झाली नसली तरी बैठक पुढील आठवड्यात होण्याची शक्यता असून त्यात टी२० विश्वचषक स्पर्धेवर चर्चा होईल.’ टी२० विश्वचषक स्पर्धा २०२० आॅस्ट्रेलियामध्ये १८ आॅक्टोबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत खेळली जाणार आहे. (वृत्तसंस्था)
आयपीएलच्या आशा उंचावल्या
- शशांक मनोहर यांच्या स्थानी अंतरिम चेअरमन म्हणून जबबादारी सांभाळणारे इम्रान ख्वाजा पुढील आठवड्यात होणाºया आयसीसीच्या बैठकीमध्ये २०२० मध्ये होणारी आयसीसी टी२० विश्वचषक आणि पुढील वर्षी २०२१ मध्ये होणारी महिला टी२० विश्वचषक स्पर्धा याच्या भविष्याबाबत निर्णय घेऊ शकतात. त्यामुळे आयपीएलचाही मार्ग मोकळा होईल. बीसीसीआय सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत आयपीएलचे आयोजन करण्यास उत्सुक आहे. जर टी२० विश्वचषक स्पर्धा स्थगित झाली, तर बीसीसीआयला आयपीएलचे आयोजन करणे सोपे होईल. त्यामुळे बीसीसीआय आयसीसीच्या निर्णयाची प्रतीक्षा करीत आहे.
विदेशात आयोजनाची शक्यता
- कोरोना चा वाढता प्रादुर्भाव बघता भारतात आयपीएलच्या आयोजनााबाबत साशंकता आहे . दरम्यान संयुक्त अरब अमिरात (युएई) व श्रीलंका क्रिकेट बोर्ड यांनी त्यांच्या देशात स्पर्धेच्या आयोजनाचा प्रस्ताव दिला आहे. १२ वर्षाच्या इतिहासात आयपीएलचे आयोजन दोनदा विदेशात (दक्षिण आफ्रिका व युएई) झालेले आहे. विदेशात स्पर्धा आयोजित करणे अधिक खर्चाचे असल्यामुळे बीसीसीआय देशात स्पर्धेचे आयोजन करण्यास प्रयत्नशील आहे.
Web Title: ICC meeting to be held next week?
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.