बाबर आजमची विक्रमी कामगिरी विराट कोहलीसाठी ठरली डोकेदुखी; पाकिस्तानी कर्णधारानं दिला मोठा धक्का

ICC Men’s ODI Player Rankings : इंग्लंडविरद्धच्या तिसऱ्या वन डे सामन्यात बाबरनं १३९ चेंडूंत १४ चौकारांसह ४ षटकार खेचून १५८ धावा कुटल्या. त्याचे हे वन डे तील १४ वे शतक ठरले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 04:53 PM2021-07-14T16:53:35+5:302021-07-14T16:53:58+5:30

whatsapp join usJoin us
ICC Men’s ODI Player Rankings : Pakistan captain Babar Azam has consolidated his position at the top  | बाबर आजमची विक्रमी कामगिरी विराट कोहलीसाठी ठरली डोकेदुखी; पाकिस्तानी कर्णधारानं दिला मोठा धक्का

बाबर आजमची विक्रमी कामगिरी विराट कोहलीसाठी ठरली डोकेदुखी; पाकिस्तानी कर्णधारानं दिला मोठा धक्का

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम ( Babar Azam) यानं आयसीसीच्या जागतिक वन डे फलंदाजांच्या क्रमवारीत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याला धक्का दिला. पाकिस्तानचा संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे आणि तीन सामन्यांच्या वन डे मालिकेत त्यांना ३-० असा सपाटून मार खावा लागला. पण, मालिकेतील तिसऱ्या सामन्यात बाबर आजमनं १५८ धावांची खेळी केली आणि ICC Men’s ODI Player Rankings मधील अव्वल स्थानावरील पकड घट्ट करताना विराटला दुसऱ्या स्थानावर ढकलले. 

आयसीसीची मोठी घोषणा, टीम इंडियाला पुन्हा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल गाठणे होणार अधिक आव्हानात्मक!

बाबरनं १३९ चेंडूंत १४ चौकारांसह ४ षटकार खेचून १५८ धावा कुटल्या. त्याचे हे वन डे तील १४ वे शतक ठरले. वन डे क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावांमध्ये १४ शतक करणारा तो पहिला फलंदाज ठरला. त्यानं ८१ डावांत हा पराक्रम करताना दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम आमला ( ८४), ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर ( ९८) आणि भारताचा विराट कोहली ( १०३) यांचा विक्रम मोडला. आयसीसीनं बुधवारी वन डे व ट्वेंटी-२० क्रिकेटची क्रमवारी जाहीर केली. 

३३१ धावा करूनही पाकिस्तान हरला; इंग्लंडच्या 'B' टीमनं जगासमोर बाबर आजमच्या टीमचं वस्त्रहरण केलं 

बाबरनं ८७३ गुणांसह अव्वल स्थानावरील पकड पक्की करताना आतापर्यंतची सर्वोत्तम गुणांची कमाई केली. विराट ८५७ गुणआंसह दुसऱ्या, तर रोहित शर्मा ८२५ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर आणि वेस्ट इंडिजचा शाय होप यांनी एका स्थानाच्या सुधारणेसह प्रत्येकी ७७३ गुणांसह संयुक्तपणे सातवे स्थान पटकावले आहे. वन डे गोलंदाजांच्या क्रमवारीत जसप्रीत बुमराह ( ६) हा एकमेव भारतीय गोलंदाज टॉप टेनमध्ये आहे. अष्टपैलू खेळाडूंमध्ये आर अश्विन नवव्या क्रमांकावर आहे.

ट्वेंटी-२० क्रमवारीत फलंदाजांमध्ये विराट कोहली ( ५) व लोकेश राहुल ( ६) यांनी टॉप टेनमधील स्थान कायम राखले आहे. गोलंदाजांत भारताचा एकही खेळाडू टॉप टेनमध्ये नाही, तर अष्टपैलू खेळाडूंमध्येही टॉप टेनमध्ये एकही खेळाडू नाही. 

Web Title: ICC Men’s ODI Player Rankings : Pakistan captain Babar Azam has consolidated his position at the top 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.