Join us  

वर्ल्ड कपपूर्वी बाबर आजम vs शुबमन गिल अशी स्पर्धा लागली, सिराजसमोर उभा ठाकला ऑसी

ICC Men’s ODI Rankings - आयसीसी वन डे वर्ल्ड कप स्पर्धा उद्यापासून सुरू होतेय आणि १९ नोव्हेंबरला विश्वविजेता संघ मिळणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2023 4:03 PM

Open in App

ICC Men’s ODI Rankings - आयसीसी वन डे वर्ल्ड कप स्पर्धा उद्यापासून सुरू होतेय आणि १९ नोव्हेंबरला विश्वविजेता संघ मिळणार आहे. चार वर्षातून एकदा येणाऱ्या या स्पर्धेसाठी सर्वच संघ जोरदार तयारी करतात आणि चाहत्यांनाही त्याची उत्सुकता असतेच. पण, त्याआधीच आता आयसीसीने खेळाडूंमध्ये स्पर्धा लावली आहे. आयसीसीने वन डे ची जागतिक क्रमवारी जाहीर केली आणि त्यात गोलंदाजांमध्ये भारताचा मोहम्मद सिराज व ऑस्ट्रेलियाला जोश हेझलवूड हे संयुक्तपणे नंबर १ वर आले आहेत. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात ८ ऑक्टोबरला वर्ल्ड कप स्पर्धेतील सामना होणार आहे. या दोन्ही गोलंदाजांचे ६६९ रेटींग पॉईंट्स झाले आहेत. सिराजचे ११ गुण कमी झाल्याने हेझलवूड संयुक्तपणे नंबर १ स्थानी आला.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन वन डे सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन लढतीत सिराजला विश्रांती दिली गेली होती आणि तिसऱ्या लढतीत त्याने ९ षटकांत ६८ धावा दिल्या. ऑस्ट्रेलियाने त्या सामन्यात ७ बाद ३५२ धावा उभ्या केल्या. त्याच सामन्यात जोश हेझलवूडने ४२ धावांत २ विकेट्स घेतल्या. त्यामुळे त्याला नंबर १ बनण्याची संधी मिळाली. अफगाणिस्तानचा मुजीब उर रहमान ६५७ पॉईंट्ससह तिसऱ्या आणि राशीद खान ( ६५५ ) चौथ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानचा शाहीन शाह आफ्रिदी ( ६३२) सहाव्या क्रमांकावर आला, तर मिचेल स्टार्क ( ६२८) आठव्या क्रमांकावर घसरला.  मोहम्मद नबी आणि कुलदीप यादव हे टॉप टेनमध्ये आहेत.  

फलंदाजांमध्ये ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर टॉप १०मध्ये आला आहे. भारताविरुद्ध त्याने सलग तीन अर्धशतकं झळकावली होती. पाकिस्तानचा बाबर आजम ( ८५७) अव्वल स्थानावर कायम आहे आणि शुबमन गिल ( ८३९) दुसऱ्या क्रमांकावर आहे. या दोघांमधील गुणांचे अंतर १० वरून ८ वर आले आहे. त्यामुळे वर्ल्ड कप संपेपर्यंत या क्रमांकावर उलटफेर झालेला पाहायला मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको. दक्षिण आफ्रिकेचा रॅसी व्हॅन डेर ड्युसेन ( ७४३), पाकिस्तानचा इमाम-उल-हक ( ७२८) हे अव्वल पाचमध्ये आहेत.  

 

टॅग्स :आयसीसीशुभमन गिलबाबर आजममोहम्मद सिराजवन डे वर्ल्ड कप