आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( ICC) २०२१पासून दर महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूला गौरविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जानेवारी महिन्यातील Men’s Player of the Month पुरस्कार टीम इंडियाचा यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंत ( Rishabh Pant) यानं पटकावला. आता फेब्रुवारी महिन्याच्या पुरस्कारासाठी ICCनं तीन नावांची नामांकन जाहीर केली आहेत आणि त्यात भारताचा फिरकीपटू आर अश्विन ( R Ashwin) याच्या नावाचा समावेश आहे. आर अश्विनसह या फेब्रुवारी महिन्यातील सर्वोत्तम पुरुष खेळाडूंच्या शर्यतीत इंग्लंडचा कर्णधार जो रूट ( Joe Root) आणि वेस्ट इंडिजचा ( Kyle Mayers) यांचा समावेश आहे. ( The ICC Men’s Player of the Month of February Nominees)
आयसीसीनं नव्यानं जाहीर केलेल्या ICC Men’s Player of the Month पुरस्काराचा पहिला मानकरी भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंत ठरला. या पुरस्कारासाठी रिषभसमोर इंग्लंडचा कर्णधार जो रुट ( Joe Root) आणि आयर्लंडचा पॉल स्टीर्लिंग यांचे आव्हान होते. जो रूटनं या महिन्यात दोन कसोटींत १०६.५०च्या सरासरीनं ४२६ धावा केल्या. आयर्लंडच्या स्टीर्लिंगनं वन डे सामन्यात १०५च्या सरासरीनं ४२० धावा चोपल्या, तर रिषभनं ८१.६६च्या सरासरीनं २४५ धावा केल्या.
फेब्रुवारी महिन्यातील खेळाडूंची कामगिरी
- जो रूट - २१८ धावा, ५५.५ सरासरी आणि ६ विकेट्स
- आर अश्विन - १०६ धावा, ३५.२ सरासरी आणि २४ विकेट्स, १५.७ सरासरी
- कायले मेयर्स - २६१ धावा, ८७ सरासरी ( पाहुणे जोमात, यजमान कोमात; कायले मेयर्सनं मोडला ६२ वर्षांपूर्वीचा भारतीय दिग्गजाचा विक्रम)